Ticker

6/Breaking/ticker-posts

अर्बन बँकेला पुर्नवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज : अॅड.अशोक कोठारी

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- विधायक रचनात्मक विचारातून व सामुहिक प्रयत्नातून अर्बन बँकेस पुनःश्च वैभवशाली स्वरूप प्राप्त होणे शक्य आहे. यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. त्या दृष्टीने मी बँकेच्या सर्व माजी संचालकमाजी सेवकसहकार व बँकिंग क्षेत्रातील निवृत्त तज्ञ अधिकारी तसेच अर्बन बँके विषयी आस्था बाळगणा-या अनेक सभासद व खातेदारांशी संपर्क साधला असून सर्वांकडून उत्तम सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बँकेचे माजी चेअरमन अॅड.अशोक कोठारी यांनी दिली.

 सतत होणाऱ्या पत्रक बाजीमुळे अर्बन बँकेची फार बदनामी झाली असून मोठे नुकसान झाल्याची खंत व्यक्त करुत अॅड.अशोक कोठारी यांनी अर्बन बँकेच्या सध्य स्थितीत बदल होण्यासाठी व बँकेला पुर्नवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज असल्याचे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात ते पुढे म्हणाले, राज्यातील अनेक बँकांवर आर्थिक संकटे आली आहेत. मात्र सेवकांची संस्था निष्ठतासामुहिक विधायक प्रयत्नातून या बँकांनी पुर्नवैभव प्राप्त केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. अर्बन बँकेमुळे माझ्या सारख्या असामान्य कार्यकर्त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळून राज्यस्तरापर्यंत कार्य करण्याची संधी मिळाली असल्याने जीवन कृतार्थ झाले आहे. त्यामुळे बँकेशी ऋणांनुबंधाचे नाते निर्माण झाले. आता बँकेचे पदाधिकारी होण्याची कोणतीही महत्वाकांक्षा उरली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

बँकेविरुद्ध झालेल्या अपप्रचाराच्या प्रवाहातील विविध घटनांचा विसर पडून तेच-तेच मुद्दे उपस्थित करण्यात काही निष्पन्न होणार नाही. बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. बँकेची 242 कोटी रुपयांच्या विविध स्वरुपाच्या वैधानिक गुंतवणूक असून 269 कोटी रुपये स्वनिधी आहे. त्यात 180 कोटी रुपये बुडीत कर्जासाठी तरतुद केलेले आहेत. बँकेच्या18 शाखा कार्यालयांच्या इमारती स्व:मालकीच्या आहेत. गेल्या चार महिन्यांत बँकेची 40 कोटी रुपयांची झालेली कर्ज वसुली पाहता बँकेचे आर्थिक आरोग्य सुदृढ होण्याकडे ही सकारात्मक वाटचाल आहे. बँकेच्या ठेवींना 5 लाखापर्यंतची हमी आहे. आता नवीन ठेवी मिळवणेअसलेल्या ठेवी टिकवणे त्यासाठी ठेवीदारांचे विश्वात्मक प्रबोधनकर्ज वसुलीउत्तम नवीन कर्जदार मिळविणेनुकसानीत असलेल्या शाखांच्या अस्तित्व संपवून बँकेचा तोटा भरुन काढण्याचे नियोजनकर्जदारांची कर्ज फेडण्याची मानसिकता विचारात घेवून त्यांना एकरकमी कर्ज परत फेड योजनेचा लाभ मिळवून देणेअतिरिक्त सेवकांना स्वेच्छानिवृत्ती देवून आस्थापनेवरील खर्चाचा भार कमी करणे इत्यादी सुत्रांचा अवलंब केला तर बँकेच्या ठेवींचा रेशो कायम राखण्यात यश मिळणार आहे.

या सर्व बाबींवर माझी बँकेच्या प्रशासकांशी चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासन खर्चात काटकसरओटीएस स्किमची प्रभावी अमंलबजावणीठेव संकलन मोहीमनवीन कर्जदार मिळविणेउत्पन्न वाढीचे प्रयत्न या विषयी बद्दल त्यांनी प्राधान्याने प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. बँके विरुद्ध आपण कधीही नकारात्मक प्रतिक्रीया दिली नाही. बँकेची प्रतिष्ठा व विश्वास जपण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाच्या सतत होतो. बँकेतल्या ठेवी काढून घेतल्या नाहीतइतरांना काढुन दिल्या नाही. उलटपक्षी नवीन ठेवी गुंतवण्याकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. बँकेच्या माजी सेवकांनी या बँकेमुळे आपल्या जीवनास प्राप्त झालेल्या सार्थकतेची जाणीव ठेवून आपल्या ठेवी विश्वासपूर्वक या बँकेत कायम ठेवल्यास त्याचा चांगला परिणाम दिसेल असे अशोक कोठारी यांनी आवाहन केले आहे. अॅड. कोठारी यांनी प्रसार माध्यमांनी थोर आणि उज्वल परंपरा लाभलेल्या या वैभवशाली बँकेस पुन्हा वैभव प्राप्त होण्यासाठी महत्वाची भुमिका घ्यावी असेही आवाहन कोठारी यांनी केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या