Ticker

6/Breaking/ticker-posts

पुण्यात आज, उद्या संपूर्ण लॉकडाऊन; अत्यावश्यक सेवेतील दुकानेही केली बंद

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पुणे: पुण्यातील करोनाची स्थिती भीषण असून गर्दी कमी करण्यासाठी संचारबंदी  र्आणि निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाने कंबर कसली असून वीकेंड लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. मुख्यत्वे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडत असल्याने ही सेवाच बंद करण्यात आली आहे. वीकेंड लॉकडाऊनला दोन्ही दिवस जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने करोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे सकाळी सात वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यासोबत कठोर निर्बंधही लादण्यात आले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याने त्याच्या नावाखाली लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. संचारबंदी असूनही अनेक शहरांत गर्दी कमी होवू शकलेली नाही. ही बाब गांभीर्याने घेत सरकारकडून कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याचवेळी पुण्यात आज प्रत्यक्ष कडक लॉकडाऊन पाहायला मिळाला. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांपैकी फक्त औषध दुकाने सुरू ठेवत बाकी सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. याबाबत पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी माहिती दिली.

वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी पुण्यात केली जात आहे. या लॉकडाऊन दरम्यान औषध दुकाने वगळता जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. संचारबंदीच्या नियमांचे कुणी उल्लंघन करत असेल तर संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे रविंद्र शिसवे यांनी सांगितले.

पुण्यातील स्थिती चिंताजनक

पुण्यात 
करोना संसर्गाची स्थिती चिंताजनक बनली आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाचे सर्वाधिक १ लाख १६ हजार ६६५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यात पुणे पालिका हद्दीत अधिकच गंभीर परिस्थिती आहे. पुणे शहरात दररोज मोठ्या संख्येने नवीन रुग्णांची भर पडत आहे. शुक्रवारी पुण्यात ५ हजार ४३७ नवीन रुग्णांची भर पडली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या