Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना संकटातही ‘राजकारण’ पोपटराव पवार व्यथित; सत्ताधारी –विरोधकांना लिहिलं पत्र

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: ‘करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. आता हे परमेश्वरी कार्य म्हणूनच शुद्ध मनाने काम केले तरच परिस्थिती आटोक्यात आणता येणे शक्य आहे. यासाठी एखाद्या शिस्त लावणाऱ्या कडक उपाययोजना करण्याची गरज आहे,’ अशी साद आदर्शगाव हिवरेबाजारचे उपसरपंच पोपट राव पवार  यांनी सरकार आणि विरोधकांना घातली आहे.

पवार यांनी मुख्यंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांना एक पत्र लिहिले आहे. त्याद्वारे ही साद घातली आहेकरोंना  रुग्णांच्या नातेवाईकांकडून सध्या मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधला जात आहे. यातील अनेक फोन पवार यांना येत आहेत. मात्र इच्छा असूनही मदत मिळवून देऊ शकत नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी सर्व नेत्यांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘सध्या करोनाची अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नाहीत, व्हेन्टीलेटर उपलब्ध नाहीत. पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे दवाखान्यातील रुग्णांना ऑक्सिजन मिळाला नाही तर भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. समाजाला जागविण्याच्या दृष्टीने इतर सर्व क्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा बंद करून फक्त दावाखान्यांसाठी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करावा, अन्यथा अतिशय भयानक असे चित्र आपल्यासमोर असेल,’ असे पवार यांनी म्हटले आहे.

अशा परिस्थितीतही सध्या पक्षीय राजकारण आणि आरोपप्रात्यारोप सुरू आहेत. त्याचाच प्रभाव धोरणे आणि निर्णयांवर होताना दिसत आहे. त्याचा थेट उल्लेख टाळून पवार यांनी सर्वच नेत्यांना साद घातली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘आता हे परमेश्वरी कार्य म्हणूनच शुद्ध मनाने काम केले तरच परिस्थिती आटोक्यात आणता येणे शक्य आहे. यासाठी एखाद्या शिस्त लावणाऱ्या उपाययोजना करण्याची गरज आहे. शेवटी यंत्रणेला दुखावून काम करणे शक्य नाही. परंतु सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्नाची गरज आहे. तरी आपण यासाठी प्रयत्न करत आहातच, परंतु माझ्यासारख्या एका गावच्या उपसरपंचाला अनेक क्षेत्रातून येणाऱ्या फोनमुळे हा पत्रप्रपंच करावा लागला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या