Ticker

6/Breaking/ticker-posts

पृथ्वीला ‘हृदय’ दिलेली प्राची सिंग कोण? सोशल मीडियावर ‘प्रेमवीरांच्या’ चर्चेला उधाण

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 19 व्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला  सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. या सामन्यात पृथ्वी शॉने 39 चेंडूत 53 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. पृथ्वी शॉच्या खेळीत एक षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. पृथ्वी शॉला त्याच्या तुफानी इनिंगसाठी मन ऑफ द मच ने गौरविन्यात आले. पृथ्वीने दाखवलेल्या बॅटच्या जलव्याने त्याची चर्चित गर्लफ्रेंड   प्राची सिंग खूश झाली आहे. तिने पृथ्वीसाठी खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

 

प्राचीने पृथ्वीला हृदय दिलं!

पृथ्वी शॉने हैदराबादविरुद्ध नजाकतीने भरलेले आपल्या भात्यातील एकापेक्षा एक शॉट्स खेळले. हे शॉट्स पाहून प्राचीचे डोळे दिपले. त्याच्या खेळीवर प्राचीने खूश होऊन खास रोमँटिक पोस्ट लिहिली. पोस्टमध्ये हृदयाची इमोजी वापरत तिने पृथ्वीला हृदयदिलं.

प्राची सिंगने शेअर केलेली पोस्ट

पृथ्वी प्राचीमध्ये नातं काय?

पृथ्वी शॉ प्राची सिंग हे एकमेकांना डेट करतात, अशा चर्चा आहेत. परंतु दोघांनीही आपण डेट करत असल्याचं जाहीरपणे कबूल केलं नाही. असं असलं तरी जेव्हा कधीही पृथ्वी सुंदर बॅटिंग करतो त्यावेळी प्राची जाहीरपणे प्रेमाचा इजहार करत पृथ्वीला सोशल मीडियावावरुन का होईना हृदय देते.

हैदराबादविरुद्ध पृथ्वीचं शानदार अर्धशतक

हैदराबादविरुद्ध पृथ्वी शानदार फॉर्मात होता. त्याने केवळ 39 चेंडूत 53 रन्स काढले. या खेळीत त्याने खणखणीत 7 चौकार लगावले तर 1 उत्तुंग षटकार खेचला. रिषभ पंतच्या चुकीमुळे फॉर्मात असलेल्या पृथ्वीला तंबूत जावं लागलं.

चेन्नईविरुद्ध पृथ्वीची बॅट बोलली होती, तेव्हाही प्राचीने रोमँटिक पोस्ट लिहिली होती…!

पृथ्वीच्या चेन्नईविरोधातील खेळीने त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंग भलतीच खूश झाली. पृथ्वीने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. प्राचीने इन्स्टग्राम पोस्ट करत पृथ्वीची तारीफ केली. पृथ्वीने काय शानदार सुरुवात केली…. असं म्हणत तिने हार्ट इमोजीही शेअर केली आहे. याअगोदरही प्राचीने पृथ्वीच्या बॅटिंग परफॉरमन्सवर आपली मतं मांडली आहेत.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या