Ticker

6/Breaking/ticker-posts

कसा असेल लॉकडाउन ? नेमके कोणते निर्बंध असू शकतात..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


मुंबई :-राज्यात 
लॉकडाउन निश्चित असताना त्यात नेमकं काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार, याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत.लोकल रेल्वे  बंद होणार का?, सर्व प्रकारच्या परिवहन सेवा बंद होणार का?, जिल्हाबंदी केली जाणार का?, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवरही वेळेचे बंधन येणार का?, अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी उत्पादनशील आस्थापने सुरू ठेवली जाणार का?, असे अनेक प्रश्न विचारले जावू लागले आहेत. याबाबत अनेक मंत्र्यांकडून सातत्याने विधाने केली गेली असून त्यातून अनेक बाबतीत स्पष्ट संकेतही मिळालेले आहेत.

नेमके कोणते निर्बंध असू शकतात...

* करोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन ही मोहीम राज्य सरकारने हाती घेतली असून त्यासाठी वीकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आता लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास वीकेंड लॉकडाऊनमधील सर्व निर्बंध इतर दिवशीही असतील व त्यात नव्याने काही सुधारणा केल्या जातील.


*  करोनाची साखळी तोडणे हा या लॉकडाऊनचा मुख्य उद्देश असेल.  त्यामुळेच गर्दी रोखण्याला अग्रक्रम दिला जाईल व त्यानुसारच सर्व निर्णय घेतले जातील, अशी शक्यता आहे.

*  लोकलमधील गर्दी ही सरकारची प्रमुख डोकेदुखी आहे. त्यामुळे लोकलसेवेवर निर्बंध येऊ शकतात. त्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू राहू शकते. इतर प्रवाशांसाठी मात्र पुन्हा लोकलची दारे बंद होण्याचीच अधिक शक्यता आहे.

* आंतरजिल्हा बस वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार नाही. अत्यावश्यक सेवा तसेच आरोग्याबाबत तातडी असल्यास परवानगी घेऊन प्रवासाची मुभा मिळू शकते. काही प्रमाणात पुन्हा जिल्हाबंदीसारखाच निर्णय होईल मात्र त्यात काही बाबतीत सूट असेल, असेही सांगण्यात येत आहे.

* सध्या वीकेंड लॉकडाऊनला जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला व फळांची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. लॉकडाऊन लागल्यास ही सुविधा कायम राहील पण त्यावर वेळेचे बंधन येऊ शकते.

*  लॉकडाऊनकाळात संचारबंदी लागू केली जाईल. त्यामुळे अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही फिरता येणार नाही, असेही सांगितले जात आहे.

* बाजारपेठा, सलून, शॉपिंग मॉल, थीएटर्स, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, उद्याने, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे लॉकडाऊन काळात पूर्णत: बंद राहू शकतात. सर्व शैक्षणिक संस्थाही बंदच राहणार.

* लॉकडाऊन लावताना अर्थचक्र काही प्रमाणात सुरू ठेवण्याबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांचा अंतर्भाव केला जाण्याचीही शक्यता आहे.

*  हातावर पोट असणारे अनेक व्यावसायिक आहेत. शिवाय  कष्टकऱ्यांचीही कोंडी होणार आहे. त्यांच्यासाठी आर्थिक मदत देताना लॉकडाऊन कालावधीत मोफत धान्य देण्याचाही विचार सरकारने केल्याचे कळते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या