Ticker

6/Breaking/ticker-posts

वाझेंच्या डायरीत नाव: मुंबईतील 'हा' बारमालक तपासाच्या फेऱ्यात..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:- माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी पोलिस आयुक्त परमबीर व सचिन वाझेच्या  खंडणी आरोप प्रकरणातील सीबीआयचा तपास आता बोरिवलीतील बार मालकाभोवती तपास फिरू लागला आहे. या बारमालकाचे नाव एनआयएच्या हाती लागलेल्या सचिन वाझेच्या डायरीत समोर आले होते. सचिन वाझे प्रकरणात तपास जवळपास पूर्णपणे संपला असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. त्यानंतर यामधील खंडणी प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने तपास सुरू केला असून बोरिवलीतील बारमालक महेश शेट्टी महत्त्वाचा भाग असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

सीबीआयनुसार, एनआयएने मागील आठवड्यात गिरगाव भागात टाकलेल्या धाडीत एक डायरी सापडली होती. त्या डायरीत विविध प्रकारचे आकडे लिहिण्यात आले होते. आकड्यांसह महेश शेट्टी या व्यक्तीचे नाव आढळले. हे आकडे खंडणीचे असून शेट्टीचा त्या खंडणीशी संबंध असल्याचा सीबीआयचा संशय आहे. त्यानुसार सीबीआयने शेट्टीबाबत तपास सुरू केला आहे.

याखेरीज मुख्य तक्रारदार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त राजू भुजबळ व निलंबित सहपोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यांचा जबाबदेखील नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात शेट्टी, वाझे, परमबीर सिंह व अनिल देशमुख यांचा नेमका संबंध काय, त्या संबंधाची साखळी शोधण्याचा प्रयत्न सीबीआयकडून सुरू आहे. त्यासाठीच सीबीाआयचे पथक लवकरच एनआयएच्या चमूशीदेखील बोलणार आहे. एनआयएशी चर्चा करुन तपासाची पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या