Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरला ऑक्सीजन एक्सप्रेस दाखल; रेल्वेने दोन टँकर पोहचले..!

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


अहमदनगर- येथे विशाखापट्टणमहून नगरला दोन ऑक्सीजनचे टॅंकर रविवारी (दि.25) पोहचले आहेत. यामुळे नगर येथील रुग्णांना काही प्रमाणात ऑक्सीजन साठा उपलब्ध झाला आहे.

कोरोना रुग्णांना अत्यावश्यक ठरलेला ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना राज्य सरकारने मोठे प्रयत्न करून विशाखापट्टणमहून रेल्वेने माध्यमातून आठ टँकर राज्यात पोहचल्या नंतर ते आवश्यक ठिकाणी उतरवून घेण्यात आले. आज शेवटचे चार ऑक्सिजन टँकर पैकी दोन नाशिकला उतरवून घेण्यात आले. इतर दोन रस्त्याच्या मार्गाने नगर जिल्ह्यात पोहच झाले आहेत. 

प्रत्येकी दहा टन ऑक्सिजन या दोन टँकरमध्ये असून यातील एक टँकर संगमनेरला दुपारी तर दुसरा टँकर नगरच्या जिल्हा रुग्णालयात पोहचल्या नंतर ऑक्सिजन टॅंकमध्ये खाली करून घेण्यात आला. 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल पोखरणा उपस्थित होते. उपलब्ध टँकरमुळे किमान दोन दिवसांची ऑक्सिजनची गरज पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर काय हा प्रश्न कायमच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या