Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात ' इतक्या ' दिवसांच्या कडक लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्र्यांचे संकेत

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजन उपलब्धतारेमडीसीव्हीरचा वापरबेड्सची उपलब्धताउपचार पद्धतीसुविधा वाढविणेनिर्बंध लावणेकडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवाअसं मत टास्क  फोर्सच्या बैठकीत मांडलं. पण टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईलअसं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत. याबाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.


गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  टास्क फोर्सची बैठक बोलावलीय. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरू आहे. कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेतला जातोय. लसीकरण आणि लॉकडाऊनवर चर्चा बैठकीत केली जात आहे. डॉक्टरांच्या टास्क फोर्समध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.


आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे

बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं. राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत डॉक्टर तात्याराव लहानेंनी व्यक्त केलंय.

लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता

लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला 1 ते 2 दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची आवश्यकता असल्याचं मतंही डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय. 14  दिवसांच्या कडक लॉकडाऊननेच कोरोनाची साखळी तुटेल, असं टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मत आहे. या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. झहीर उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या