Ticker

6/Breaking/ticker-posts

Samsung Galaxy M51 स्मार्टफोनवर मोठी सूट, काय आहे किंमत आणि ऑफर?

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः अॅमेझॉनवर फॅब फोन्स फेस्ट सेल सुरू आहे. २५ मार्च पर्यंत सुरू असणाऱ्या या सेल मध्ये Amazon Fab  Phones Fest मध्ये सॅमसंग, वनप्लस, रेडमी, ओप्पो सह अनेक स्मार्टफोनवर सूट मिळत आहे. जर तुम्हाला 7000 m Ah बॅटरीचा Samsung Galaxy M 51 स्मार्टफोनवर मोठी सूट, काय आहे किंमत आणि ऑफर?

स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. गॅलेक्सी एम ५१ सेलमध्ये कूपन कोड आणि बँक ऑफर्स सोबत स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

Samsung Galaxy M 51: सूट आणि ऑफर्स
सॅमसंग गॅलेक्सी एम ५१ च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये अॅमेझॉनवरून फोनला कूपन कोड लावून १२५० रुपयांची सूट दिली जाते. हे कूपन कोड तुम्हाला अॅमेझॉनवर लिस्ट किंमतीत मिळणार आहे. याशिवाय, I C I C I बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर फोन खरेदीवर १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. जर जुना फोन एक्सचेंज केल्यास १३ हजार ४५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.


Samsung Galaxy M 51:फीचर्स
सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.७ इंचाचा एसअमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ६ जीबी व ८ जीबी रॅम पर्याय दिले आहेत. स्टोरेज साठी १२८ जीबी ऑप्शन दिले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते. फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम सोबत येतो. फोनला पॉवर देण्यासाठी 7000 m A h बॅटरी दिली आहे. हँडसेटमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिले आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फेस अनलॉक, आणि फिंगरप्रिंट सेन्सर सह सिक्योरिटी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या