Ticker

6/Breaking/ticker-posts

JEE मेन निकाल जाहीर; 6 विद्यार्थ्यांना 100 एनटीए गुण, महाराष्ट्रातील एक टॉपर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency, NTA) संयुक्त प्रवेश परीक्षा 2021 (JEE Main Result 2021) च्या फेब्रुवारी सत्राचा निकाल जाहीर केलाय.  सत्रात 6 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए गुण मिळवलेत, तर 41 विद्यार्थी टॉपर्सच्या यादीत आहेत. विशेष म्हणजे 100 एनटीए स्कोअर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील सिद्धार्थ मुखर्जीने मिळवले 100 एनटीए गुण

महाराष्ट्रातील सिद्धार्थ मुखर्जी, राजस्थानातील साकेत झा, दिल्लीचा प्रवर कटारिया, दिल्लीचा रणजिम दास, चंदीगडचा गुरमरित सिंग, गुजरातचा अनंत किदंबी या सहा विद्यार्थ्यांनी 100 एनटीए गुण मिळवलेत.

या परीक्षेला 95 टक्के विद्यार्थी

या परीक्षेला जवळपास 95 टक्के विद्यार्थी बसले होते. 23  फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. पहिल्यांदाच तब्बल 13 भाषांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळ्म, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू, गुजराती या भाषांचा समावेश होता.

जेईई मेन परीक्षेनंतर काय

जर आपण टॉप 2,50,000 उमेदवारांपैकी असाल तर आपल्याला जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी बसण्याची संधी मिळेल. लक्षात ठेवा की, परीक्षा आणखी तीन सत्रांमध्ये घेण्यात येईल. या सत्रांमध्ये आपण आपली गुणवत्ता सुधारू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरुवातीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवता आले नाही तर तुम्ही दुसर्‍या परीक्षेत बसून चांगले गुण मिळवू शकता. एनटीएकडून आपल्याला देण्यात आलेल्या तीन सत्रांपैकी ज्या सत्रात सर्वाधिक गुण असतील, त्या सत्राचा विचार केला जाईल. त्या सर्वाधिक गुणांच्या साहाय्याने रँक लिस्ट तयार केली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)