Ticker

6/Breaking/ticker-posts

मोठी घोषणा ! गुगल 10 लाख भारतीय महिला उद्योजकांना करणार मदत

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगलने मोठी घोषणा केलीय. गुगलने भारतातील दहा लाख महिला उद्योजकांना मदत करण्याचे आश्वासन दिलेय. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शनिवारी ही घोषणा केली. भारतासह सुंदर पिचाई यांनी जगातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी 2.5 कोटी डॉलर्स देण्याची घोषणा केली. हे पैसे भारत आणि जगभरातील ना नफा तत्त्वावर आणि सामाजिक उपक्रमांना अनुदान म्हणून दिले जाणार आहेत. सुंदर पिचाई म्हणालेत की, भारतातील खेड्यांमधील 10 लाख महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, साधने आणि सदस्यता यांच्या माध्यमातून गुगल इंटरनेट साथी कार्यक्रमात मदत करणार आहे. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

महिला वर्कर्ससाठी Google.org कडून 50 हजार डॉलरचा निधी

गुगलने आज गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात 1 लाख महिला वर्कर्ससाठी Google.org कडून 50 हजार डॉलरच्या निधीची घोषणा केली, जो निधी  Nasscom फाऊंडेशनला महिलांच्या पाठिंब्यासाठी दिला जाणार आहे. गुगलद्वारे दिलेल्या या फंडानंतर NASSCOM फाऊंडेशन भारतातील काही राज्यांमध्ये ग्रामीण महिलांना डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेसाठी प्रशिक्षण देणार आहे.

10 लाख महिलांना मदत करणार

कंपनीच्या माहितीनुसार, इंटरनेटचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलाय. Google  ने भारतातील ग्रामीण भागातील 10 लाख महिलांना उद्योगासाठी कंपनी मदत करणार असल्याचं सांगितलं. कंपनीने यासाठी Women Will वेब व्यासपीठही निर्माण केलंय. अद्यापही अनेक महिलांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट उपलब्ध नाही, ते या अभियानाच्या मदतीने त्यांचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत. इंटरनेट साथी 2015 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. गुगल इंडियाचे भारतातील मॅनेजर आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी कंपनीच्या या अभियानाची सुरुवात केली होती, इंटरनेट साथीमध्ये आता 80 हजार स्वयंसेवक आहेत, हा कार्यक्रम देशातील 3 लाख गावांपर्यंत पोहोचलाय.

लाखो रोजगार निर्माण होणार

या अभियानांतर्गत 3 कोटी महिलांना चांगली कनेक्टिविटी, स्वस्त फोन आणि भारतीय भाषेचा सर्वोत्तम वापर त्यांच्या फोनमध्ये दिलाय. महत्त्वाचे म्हणजे पिचाई म्हणालेत की, फक्त स्वत: चेच नव्हे तर इतरांचेही जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सक्षम असेल पाहिजे. लहानपणीचे दिवस आठवताना पिचाई यांनी त्यांच्या आईचंही उदाहरण दिलंय. पिचाई पुढे म्हणाले की, महिला उद्योजकांना स्वावलंबी केल्यास लाखो रोजगार निर्माण होऊ शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या