Ticker

6/Breaking/ticker-posts

अटक टाळण्यासाठी आरोपीने घेतला रुग्णालयाचा आसरा, अन् तिथंच…

 


लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ.नगर: खुनासह अन्य गुन्हे करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. मात्र, या टोळीतील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर त्याने अटक टाळण्यासाठी रुग्णालयाचा आसरा घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुपा येथील एका खासगी रुग्णालयात आरोपी दाखल झाला होता. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयात आणून तपासणी केल्यावर त्याचा बनाव उघड झाला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याला आश्रय देणाऱ्या हॉस्पिटलवर काय कारवाई होणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

सुनील फक्कड आडसरे (वय २६, रा. शेडाळा, ता. आष्टी) याला पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे सहा महिन्यांपासून तो फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली होती. नगर आणि बीड जिल्ह्यात त्या शोध सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपी सुप्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस पथके पाठविली. पोलिसांना शोधाशोध सुरू केल्यावर सुप्यातील निरामय हॉस्पिटलमध्ये तो उपचारासाठी दाखल असल्याची माहिती मिळाली. मात्र, आडसरे याला गंभीर आजार नसावा, असा संशय त्याला पाहताच क्षणी आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेतले. नगरच्या सरकारी रुग्णालयात आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. खात्री पटल्यावर त्याला नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या