Ticker

6/Breaking/ticker-posts

'मार्च एण्ड' ला बँका राहणार "इतक्या" दिवस बंद !

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात नागरिकांना पुन्हा एकदा बँकेचे कामे करण्यापूर्वी वेळेचे नियोजन करावे लागणार आहे. गेल्याच आठवड्याच्या शेवटी दोन दिवस आणि मागील सोमवार आणि मंगळवार बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सार्वजनिक बँकांचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.

या महिन्यात आर्थिक वर्षाची अखेर असल्याने बँकांसाठी मार्च महिना महत्वाचा असतो. त्यातच होळीची सार्वजनिक सुट्टी आणि चौथा शनिवार असल्याने शेवटच्या आठवड्यात केवळ दोन दिवस बँकांचे कामकाज होणार आहे. या दोन दिवसात बँक कामे उरकली नाही तर ग्राहकांना ३ एप्रिलपर्यंत वाट पहावी लागेल.

रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग कॅलेंडरनुसार २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान केवळ दोनच दिवस बँकांचे कामकाज होणार आहे. तर महिनाअखेर सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहे. २७ मार्च रोजी चौथा शनिवार आणि २९ मार्च रोजी सोमवारी धुलिवंदनाची सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका २७ मार्च, २८ मार्च आणि २९ मार्च अशा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत.

अशी करा वर्षाची सुरवात

बँका थेट ३० मार्च रोजी खुल्या होतील. त्यानंतर ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा हिशेब असल्याने बँकांची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असेल. गुरुवारी १ एप्रिल रोजी बँका नेहमी प्रमाणे सुरु राहतील. तर २ एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने पुन्हा बँकांचे कामकाज बंद राहील. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असल्याने बँका बंद असतील. ३ एप्रिल रोजी शनिवारी बँका नेहमी प्रमाणे सुरु राहणार आहेत. दरम्यान, एप्रिलमध्ये देखील आठ सार्वजनिक सुट्ट्या असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकिंग कामे उरकण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी १५ आणि १६ मार्च असा दोन दिवसीय संप केला होता. या संपात देशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाल्याने दोन दिवस सरकारी बँकांची सेवा कोलमडली होती. बँकांची सेवा शाखा बंद असल्याने सोमवारी तब्बल १६५०० कोटीचे चेकचे व्यवहार होऊ शकले नाहीत. या काळात ग्राहकांना एटीएम आणि डिजिटल बँकिंग सेवेवर अवलंबून रहावे लागले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या