Ticker

6/Breaking/ticker-posts

नूतन जिल्हाधिकारी कार्यालय : महाराष्ट्र दिनी उद्घाटनाचा प्रयत्न-ना. बाळासाहेब थोरात

 

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे सुरु असलेले कामाची पाहणी महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात यांनी केली यावेळी जलंसधारण मंत्री ना शंकरराव गडाख ,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले ,जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील ,सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियता ,निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित ,प्रांतधिकारी श्रीनिवास अर्जुन आदी उपस्थित होते. ( फोटो - राजू खरपुडे ,नगर)

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर: प्रशासकीय दृष्ट्या सर्वाधीक महत्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी त्याचे सर्व काम पूर्ण होऊन उद्धाटन करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

ना. थोरात आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे आज अहमदनगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसलेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णीनिवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचितसा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवारउपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची यावेळी उपस्थिती होती.

ना. थोरात हे मागील काळात महसूलमंत्री असतानाच नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारत बांधकामास मंजुरी मिळून त्याची सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या टप्प्यात २८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यानमधल्या काळात इमारत बांधकाम थंडावले होते. ते काम आता जवळपास पूर्णत्वास गेले असून इमारतीतील फर्निचर तसेच इतर अनुषंगिक कामे होत आहेत. त्यासाठीचा आवश्यक निधीही उपलब्ध होऊन महाराष्ट्र दिनापर्यंत सर्व बाबींची पूर्तता होईल आणि नवीन अत्याधुनिकदेखणे असे जिल्हाधिकारी कार्यालय तयार होईलअसा विश्वास श्री. थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी महसूलमंत्री श्री. थोरात यांनी या नूतन इमारतीची पाहणी केली. प्रत्येक मजला त्यांनी पाहिला. कामाचे स्वरुप आणि दर्जाप्रलंबित कामांसाठी लागणारा वेळत्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आदींची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि अधीक्षक अभियंता श्री. कुलकर्णी यांच्याकडून घेतली. प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 


 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या