Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगांव पं. स . सभापती क्षितीज घुले 'या'कारणामुळे चर्चेत..!

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव : -शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांचा घरकुल लाभार्थी माहिलेचे दर्शन घेताना चा फोटो समाज माध्यमावर गेल्या चार पाच दिवसापासुन सगळीकडे फिरत आहे. या फोटोला लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील यांचा संस्कारी वारसा, घुले घराणे नम्र आहे

युवकांचे ह्रदयसम्राट,भावी आमदार अशा प्रकारच्या प्रतिक्रीया मिळतांना दिसत आहेत. सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी सभापती झाल्यापासुन तालूक्याच्या ग्रामिण भागात विकास कामाचा धडाका लावला आहे.विकासकामे करतांना पक्षीय किंवा इतर कोणत्याच प्रकारचा भेदभाव करीत नाहीत. तालूक्याच्या ग्रामिण भागातून पंचायत समितीत काम घेवून येणाऱ्या मानासाचे काम त्याच दिवशी झाले पाहीजे आणी दिवस मावळण्याआधी तो आपल्या घरी गेला पाहीजे असा घुले यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे संबंधीत आधिकारी आणी कर्मचारी यांच्या बरोबर घुले यांचे अनेक वेळा वाद होतात.

विकास कामांमुळे अनेक गावांचे रुप पालटू लागलेले आहे. प्रत्येक गावात विकास कामांचा आढावा ते प्रत्यक्ष भेट देऊन घेत आहेत. अधिकाऱ्यांवर विसंबून न रहाता ते प्रत्यक्ष कामांना भेटी देऊन पहाणी करीत आहे.सध्या तालुक्यात सुरु असलेल्या घरकुल कामांचा आढावा घेऊन, घरकुलांच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन,लाभर्थ्याच्या अडचणी समजुन घेवून सभापती आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहेत.यामुळे कामे वेगाने होऊ लागलेली आहेत. 

गेल्या चार वर्षात घुले यांनी पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात जवळपास साडेपाच हजार घरकुले मंजुर करून बांधून घेतली आहेत. जवळपास नव्वद टक्के लाभार्थी कुंटूब नव्या घरात राहत आहेत तर कोरोना महामारी मुळे अपुर्ण असलेली घरकुले पुर्णत्वाकडे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या