Ticker

6/Breaking/ticker-posts

विधी (लॉ)अभ्यासक्रम प्रवेश: सुधारित शेड्युल जारी..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने  विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी झालेल्या एमएचटी सीईटी लॉ २०२० (MHT CET Law 2020) साठी सुधारित समुपदेशन शेड्युल जारी केले आहे. कक्षाने हे वेळापत्रक एलएलबीच्या पाच वर्ष आणि तीन वर्ष मुदतीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी जारी केलं आहे. कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वर हे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.
MHT CET Law 2020: संपूर्ण शेड्यूल पुढीलप्रमाणे -

एलएलबी तीन वर्षे मुदतीचा अभ्यासक्रम

सीट अलॉटमेंटची दुसरी यादी - १५ मार्च २०२१
महाविद्यालयात रिपोर्ट करणे - १६ मार्च २०२१
निश्चित केलेल्या प्रवेशांची स्थिती जारी करणे - १६ मार्च २०२१
रिक्त जागांची स्थिती जारी करणे - २२ मार्च २०२१
या वेळापत्रकानुसार, अलॉटमेंटची दुसरी यादी जी ८ मार्च रोजी जारी होणार होती, स्थगित करण्यात आली आहे. आता एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दुसरी अलॉटमेंट यादी १५ मार्च रोजी जारी होईल. एलएलबी ५ वर्षांचा अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी दुसरी अलॉटमेंट यादी १२ मार्च २०२१ रोजी जारी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी काऊन्सेलिंग राउंडसाठी अर्ज केला आहे ते अधिकृत पोर्टलवर शेड्युल तपासू शकतात.

एलएलबी पाच वर्षे मुदतीचा अभ्यासक्रम

सीट अलॉटमेंटची दुसरी यादी - १२ मार्च २०२१
महाविद्यालयात रिपोर्ट करणे - १३ मार्च २०२१
निश्चित केलेल्या प्रवेशांची स्थिती जारी करणे - १२ मार्च २०२१
रिक्त जागांची स्थिती जारी करणे - १८ मार्च २०२१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या