Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबई विद्यापीठ: पेट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:- विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार २५ मार्च रोजी एमफील तर २६ आणि २७ मार्च २०२१ रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा होणार आहे. एकूण ७९ विषयांसाठी ही परीक्षा ॲानलाईन पद्धतीने होणार असून याबाबतचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पेट परीक्षेच्या नियोजनाचा भाग म्हणून दिनांक १२ ते १७ मार्च दरम्यान विद्यार्थ्यांना मॅाक (सराव) परीक्षा देता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना लघुसंदेश आणि ईमेलवर माहिती पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यास चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत विद्यापीठाकडे पेट परीक्षेसाठी ११ हजार ७५९ एवढे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये पीएचडी साठी ११ हजार ३५२ तर एमफील साठी ४०७ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये पीएचडी साठी ४ हजार ९१४ एवढे विद्यार्थी असून ६ हजार ४३७ विद्यार्थीनींचा समावेश आहे. तर एमफील साठी १९७ विद्यार्थी आणि २१० विद्यार्थीनींचा समावेश आहे.

पीएचडीसाठी विद्याशाखानिहाय वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी २०७२, मानव्यविद्या ३२९९, आंतरविद्याशाखा ६८९ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५२९१ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर एमफील प्रवेश परीक्षेच्या ४०७ अर्जांपैकी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी १०१, मानव्यविद्या २३९, आंतरविद्याशाखा २० आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ४७ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी मराहाष्ट्रातून ११ हजार २२ आणि इतर राज्यातून ७३७ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या