Ticker

6/Breaking/ticker-posts

'संपदा' पतसंस्थेच्या ठेवी मिळण्याचा मार्ग मोकळा !

 




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर - येथील संपदा नागरी सहकारी पतसंस्थेकडे जवळपास ३२ कोटींच्या ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. त्या ठेवी व्याजासह मिळाव्यात म्हणून संपदा नागरी सहकारी पंतसंस्थेचे ठेवीदार सौ. संध्या चंद्रकांत खुळे, चंद्रकांत रामकृष्ण खुळे, धनंजय मधुकर पांडकर आदींनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच अहमदनगरकडे संपदा नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेव वाफारेंसह इतर पदाधिकाऱ्यांविरुध्द दाद मागितली होती. यात जिल्हा ग्राहक मंचाने सर्व तत्कालीन संचालकांना दोषी धरून व्याजासह ठेवी देण्याचा आदेश केलेला होता.

सदरच्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार नगर यांच्याकडे आर. आर. सी.वसुलीसाठी हे प्रकरण जिल्हा ग्राहक मंचाने पाठविलेले होते. त्यानुसार तहसीलदार नगर यांनी संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तत्कालीन संचालकांच्या नगर तालुक्यातील स्थावर मालमत्ता जप्त करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या संपतीची विक्री करण्याचा निर्णय तहसीलदार नगर यांनी घेऊन पुढील कारवाई केली

लिलाव प्रक्रिया सुरू करून लिलाव धारकांकडून स्थावर मालमत्ता विक्रीच्या २५ टक्के रक्कमा भरून घेतल्या. त्यानंतर ही बाब मान्य नसल्याने ज्ञानदेव वाफारे व इतर संचालकांनी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात पिटीशन दाखल केले. त्यामध्ये उभय बाजूंचा युक्तिवाद झाल्यावर उच्च न्यायालयाने वाफारे यांचे अपिल फेटाळून लावले आहे. अशी माहिती अॅड. सुरेश लगड यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या