Ticker

6/Breaking/ticker-posts

' या ' जिल्ह्यात एसटी पुन्हा 15 दिवस बंद ..!

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


परभणी : -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी निर्बंध आणखीन कडक केलेत . मात्र या निर्बंधांचा फटका विविध विभागांना बसतोय 22 मार्च 31 मार्च दरम्यान जिल्ह्यातील खाजगी व प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला होता. त्यानंतर आज या आदेशाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

15 एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे एसटी, ट्रॅव्हल्स 15 एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत . याचा फटका एसटी महामंडळाला बसतोय.

परभणी जिल्ह्यातून रोज जवळपास 800 ते 900 फेऱ्या होतात .त्यातून 30 लाखांचा नफा महामंडळाला होतो मात्र मागच्या आठ दिवसात एसटी पूर्णतः बंद आहे. त्यानंतर आता परत पंधरा दिवस पुन्हा एकदा एसटी बंद असल्याने महामंडळाला याचे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या