Ticker

6/Breaking/ticker-posts

घोड धरणाचे दरवाजे उघडले. पाण्याचा जपुन वापर करा – आ. बबनराव पाचपुते


 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

काष्टी:-घोड धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून सध्याचे आवर्तन शेतीसाठी सोडले असल्यामुळे सर्वाना पाणी मिळणार आहे मात्र शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.  काल आ. पाचपुते यांच्या हस्ते घोड धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्यामुळे शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली होती त्यामुळे आमदार बबनराव पाचपुते यांनी मंत्री स्थरावर पाठपुरावा करून घोडच्या आवर्तनासंदर्भात ठरवल्याप्रमाणे निर्णय घेतला व दि.२७ रोजी आ.पाचपुते यांच्या हस्ते आवर्तन सोडण्यात आले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे ,लेबर फेडरेशनचे संचालक अनिल पाचपुते ,भाऊसाहेब कोळपे ,सतीश धावडे ,सुनील महाडिक,संतोष रायकर ,बाळासाहेब पाचपुते ,दिगंबर रायकर ,मोहन रायकर घोडचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते . टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या