Ticker

6/Breaking/ticker-posts

लोकनेता न्यूजच्या वृतावर शिक्कामोर्तब ...बीड जिल्ह्यात झाले अखेर .. लॉकडाऊन ..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

बीड : -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा आलेख उंचावत आहे. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक कोरोना विषयक नियमावलीची पायमल्ली करत असल्याने हा आकडा वाढतो आहे. बीड जिल्हा प्रशासनाने सर्वच व्यापाऱ्यांचे दुकान सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने अखेर बुधवार पासून बीड जिल्हा संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे . याबाबतचे वृत सर्वात प्रथम लोकनेता न्यूज ऑनलाईन नेटवर्कने दिले होते . त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे .

याबाबत  अधिकृत आदेश दि २४ रोजी जारी करण्यात आले. हा लॉक डाऊन १० दिवसासाठी असेल . मात्र 25 मार्चला रात्री १२ वाजल्यापासून ते ४ एप्रिल असा 10 दिवसांसाठी बीड जिल्हा बंद राहणार आहे तसे आदेशच जिल्हाधिकारी जगताप यांनी जारी केले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता मंगल कार्यालये , हॉटेल्स तसेच बाजारपेठा बंद राहणार आहेत . त्यामुळेमुळे 25 मार्चला सायंकाळी ७ वाजता बंद केलेली दुकाने ५ एप्रीललाच सकाळी उघडणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या