Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव शहरात मनसेच्या वतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी ;

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

भामाबाई कुसळकर यांना ११ हजाराची मदत

शेवगाव :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेवगाव शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन माजी सभापती अरूण पाटील लांडे, संजय फडके, पवनकुमार साळवे, सुनिल रासने मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील निराधार कर्करोगाचे पिडीत असलेल्या भामाबाई कुसळकर यांना ११०००/- रूपयांची रोख स्वरूपात मदत करण्यात आली. तसेच रोटरी क्लबच्या वतीने हाॅस्पिटलचा संपूर्ण खर्च करण्याचे रोटरी क्लबचे बाळासाहेब चौधरी व प्रा. किसनराव माने यांनी घेतली आहे. तसेच शहरातील दुर्लक्षित असलेल्या डोबांरी वस्तीतील मुलांना वह्या,पाट्या,पेन,पेन्सिल व ईतर शालेय साहित्याचे वाटप मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष श्री गणेश रांधवणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शहरातील  प्रमुख रस्त्यावर स्वागत कमानी व मनसेचे झेंडे लक्ष वेधून घेत होते. मनसेने शिवजयंती निम्मित्त राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

 यावेळी या कार्यक्रमात प्रशांत भराट, राहूल सांवत,गणेश डोमकावळे , ज्ञानेश्वर कुसळकर,दिलीप सुपारे, दिपेश पिटेकर,संजय वणवे, संदिप देशमुख,देविदास हुशार, रामेश्वर बलिया,संजय बडे,विठ्ठल दुधाळ,अभिजीत शेळके, निवृत्ती आधाट, बाळा वाघ,अमिन सय्यद ,विनोद ठाणगे पाटील,सोमनाथ आधाट,राजू चव्हाण, बाळासाहेब शित्रे,सावता पुंड,मंगेश लोंढे, सुरज कुसळकर, विजय धनवडे,भाऊ बैरागी,बाळासाहेब फटांगरे, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या