Ticker

6/Breaking/ticker-posts

'पहिल्या नवऱ्याला का सोडलंस?' म्हणत अभिज्ञा भावेला केलं ट्रोल..

 

लोकनेता
 न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क


मुंबई:
अभिज्ञानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नुकताच एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. तिनं यात काही युझर्सच्या कमेंटचा उल्लेख केला होता. काही यझर्सनी अभिज्ञाला दुसऱ्या लग्नानंतर 'पहिल्या नवऱ्या का सोडलं' असं म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अभिज्ञाला दुसऱ्या लग्नानंतर ट्रोल करत एका युझरनं लिहिलं, 'दुसऱ्या नवऱ्याचं काय एवढं, पहिला नवऱ्याला का सोडलं?' युझर्सच्या या कमेंटवर अभिज्ञानं त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

 मागच्या काही काळापासून मराठी सिनेसृष्टीत लग्न सराईचा काळ सुरू आहे. मागच्या महिन्याभरात अनेक मराठी स्टार कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. सिद्धार्थ-मिताली, आस्ताद-स्वप्नाली यांच्या काही दिवस आधीच अभिनेत्री अभिज्ञा सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकली. अभिज्ञानं नव वर्षांच्या सुरुवातीला बिझनेसमन मेहुल पै याच्याशी लग्न केलं. तिच्या या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली होती.


अभिज्ञा भावे आणि मेहुल पै ६ जानेवारी २०२१ रोजी मुंबईमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या लग्नाला मराठी सिने आणि टीव्ही सृष्टीतील अनेक स्टार कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते. अभिज्ञाचं हे दुसरं लग्न होतं. पण तिनं दुसऱ्यांदा लग्न केल्यानं तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला गेला. पण त्यावर अभिनेत्रीनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.

तिनं या युझरला रिप्लाय देत लिहिलं, 'माझी सीरियल टीव्ही वर बघता. आयुष्य नाही. देव तुमच्यावर अशी वेळ आणू नये ही प्रार्थना.' त्यानंतर अभिज्ञानं हा स्क्रिनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत, 'दुर्दैवाने माझेच मराठी बांधव' असं कॅप्शन दिलं आहे.

अभिज्ञानं २०१४ मध्ये वरुण वैतीकरशी लग्न केलं होतं. पण त्या दोघांचं नात फार काळ टिकू शकलं नाही आणि मग ते वेगळे झाले. त्यानंतर आता नव वर्षांच्या सुरुवातीला अभिज्ञा दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकली. तिनं 'लगोरी', 'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे', 'रंग माझा वेगळा' अशा काही लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी अभिज्ञा एअर होस्टेस होती. अभिनयाव्यतिरिक्त अभिज्ञा आणि तेजस्विनी पंडित यांनी एकत्र येत तेजाज्ञा हा फॅशन ब्रँडची स्थापना केली आहे आणि ब्रँड अल्पवधीतच लोकप्रिय सुद्धा झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या