Ticker

6/Breaking/ticker-posts

धुळ्यातील लॉकडाऊन 15 एप्रिलपर्यंत वाढवला?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

धुळेः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धुळे जिल्ह्यात लॉकडाऊन आता वाढवण्यात आलाय. जिल्ह्यातील लॉकडाऊन आता 15 एप्रिलपर्यंत असणार आहे, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलाय.


 रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. दिवसा शासन निर्देशाप्रमाणे कामकाजाला मुभा देत असल्याचं जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितलंय. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशाची कठोर अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आलाय. 27  तारखेपासून जनता संचारबंदी लागू केल्यानंतर आता 15 एप्रिलपर्यंत रात्रीच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. दिवसाची  जनता संचारबंदी उद्या सकाळी संपणार आहे. सर्व आस्थापनांमध्ये कठोर नियमांची अंमलबजावणी सक्तीची करण्यात आलीय.


15 एप्रिलपर्यंत रात्रीच्या लॉकडाऊनचा निर्णय

तत्पूर्वी धुळे जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता तर सर्व बंद राहणार आहे, असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. 30  मार्चच्या सकाळी 6 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. पण आता रात्रीच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे 15 एप्रिलपर्यंत रात्रीचा लॉकडाऊन राहणार आहे. दिवसभर आस्थापने, दुकाने इतर व्यवहार सुरू असणार आहेत. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात 14 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते 17 मार्च  पहाटे सहा वाजेपर्यंत असा एकूण 4 दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळ्यात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या