Ticker

6/Breaking/ticker-posts

सदस्यांची" अशी ही पळवा -पळवी . " चर्चेत . !


 टाकळी ढोकेश्वर मध्ये सर्वसामान्य जनतेमधून तीव्र संताप....!

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

टाकळी ढोकेश्वर:- पारनेर तालुक्यातील अनेक निवडणूकांचे केंद्रबिंदू असणा-या टाकळीढोकेश्वर येथील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य व विरोधी सदस्य एकत्र सहलीला गेल्याने टाकळी ढोकेश्वर येथील वातावरण तापले असून याचे तरूणांमध्ये तिव्र पडसाद उमटत आहे.

 पारनेर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणुका होऊन सरपंचपदाचे आरक्षण जसे जाहीर झाले आणी तदनंतर ९ व १० फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंच पदाची निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला आहे.

मात्र आरक्षण जाहीर झाल्यापासूनच सदस्यांची पळवापळवी सुरू होती, आता या पळवापळवीला आणखीच वेग आला असून टाकळी ढोकेश्वर मध्ये मोठा घोडेबाजार होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. टाकळी ढोकेश्वर सह इतर मोठ्या गावांचा या निवडणुकीत समावेश होता. या निवडणुकांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात उतरल्याने निवडणुकीत रंग भरला होता.प्रथमच या  निवडणुकीत अनेक मातब्बरांना धक्का बसला तर अनेक ठिकाणी सत्तांतरही घडले असताना टाकळी ढोकेश्वर मध्ये जेष्ठ नेते सिताराम खिलारी व आमदार निलेश लंके पुरस्कृत ढोकेश्वर ग्रामविकास पँनेलला १० तर अशोक कटारिया व माजी आ.विजय औटी पुरस्कृत जनसेवा पँनेलला ५ जागा मिळाल्या आहे.  

        ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अखेर २७ जानेवारीला आरक्षणाची सोडत निघाली.यात काहींना लॉटरी लागली तर काहींच्या अपेक्षेवर पाणी पडले. आरक्षण जाहीर होतात सरपंचपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे . तर काठावर बहुमत असणाऱ्या गावातील सदस्यांची पळवापळवही झाली. मात्र टाकळी ढोकेश्वरला ढोकेश्वर ग्रामविकास पँनेलला १५ पैकी १० जागा मिळून स्पष्ट बहुमत असतानाही आमदार निलेश लंके गटाचे चार व माजी आमदार विजय औटी  गटाचे पाच सदस्य अशी व्यूहरचना होवून एकत्र सहलीला गेल्याने एकमेकाच्या विरोधात असलेले सदस्य एकत्र आल्यामुळे हा नियोजीत कट असल्याचे तरूणांमध्ये चर्चा झडू लागल्याने सर्वसामान्य जनतेमधून प्रचंड तिव्र प्रतिक्रिया येत आहे. सध्या या राजकीय सोईच्या "अर्थ" पूर्ण पळवा -पळवीची पंचक्रोशीत ससभरीत चर्चा झडू लागली आहे .

उमेदवार विजयी होताच विरोधीगटात सामील...

तरूणांना बरोबर घेवून विजय मिळविणारे विजयी उमेदवार तरूणांना न विचारताच व सहलीली रवाना झाल्याने तरूणांकडून तिव्र प्रतिक्रिया येत असून सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड असंतोष दिसत असून सरपंच उपसरपंच निवडी प्रसंगी मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता तरूणांमधून वर्तविली जात आहेत.

विखे गट टाकला खडयासारखा बाजूला ...

टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीवर आमदार निलेश लंके व खासदार डाँ.सुजय विखे यांचे समर्थक सिताराम खिलारी यांचे १५ पैकी १० जागांवर वर्चस्व असताना खासदार डाँ.सुजय विखे समर्थकांना खडयासारखे बाजूला करत १० पैकी ४ सदस्य माजी आमदार विजय औटी समर्थकांना मिळत आ.लंके यांचा सरपंच तर माजी आ.औटी यांचा उपसरपंच करण्यासाठी एकत्र सहलीला रवाना झाल्याने पारनेर तालुक्यात खा.विखे यांना थोपविण्याचा प्रयत्न आमदार लंके यांनी केला असल्याचे उघडपणे सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा झडत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या