Ticker

6/Breaking/ticker-posts

अवकाळीची नुकसान भरपाई नाही , रास्तारोको आंदोलन - पालवे

 
26 फेब्रुवारीस चिचोंडी शिराळलाआंदोनलन करणार :-शिवाजी पालवे

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 अहमनगर : मागच्या वर्षी अवकाळी पाऊस झाला शेतीचे मोठे नुकसान झाले महाराष्ट्र शासनाने नुसकान भरपाई जाहीर केली पंचनामे झाले परंतु शेतकर्याच्या खात्यात पैसे आले नाही . याबाबत वारंवार निवेदनं देऊनही काहीही कार्यवाही झाली नसल्यामुळे नाईलाजास्तव येत्या २६ फेब्रुवारी रोजी चिचोंडी शिराळ येथे रास्ता रोका आंदोलन करण्याचा इशारा जय हिंदचे  फौंडेशन चे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिला आहे .

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात  त्यांनी म्हटले आहे की . मागच्या वर्षी अवकाळी पाऊस झाला . शेतीचे मोठे नुकसान झाले . महाराष्ट्र शासनाने नुसकान भरपाई जाहीर केली . पंचनामे झाले परंतु शेतकर्याच्या खात्यात पैसे आले नाही .पैसे पाठवले पण ते काही गावातील शेतकर्याना मिळाले  परंतु कोल्हार शिराळ व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्याना अजुन         नुुुकसान भरपाईचे पैैैैसे मिळाली नाही .

 याबाबत जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर च्या माध्यमातुन दिनांक 20/11 /2020 ला निवेदन पाथर्डी तहसीलदार यांना  दिले होते .परंतु  20/01/21 एक महीना होऊन देखील काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही .पत्राचे उत्तर देखील मिळालेले नाही .   कोरोना मुळे शेतकरी अडचणीत आहे . शेतकर्यास न्याय मिळणे गरजेचे आहे . त्यामुळे आंम्ही नाईलाजस्तव दिनांक 26 फेब्रुवारी 21रोजी सकाळी 9:30वाजता चिचोंडी शिराळ येथे रास्तारोको आंदोलन करत आहोत . 

तरी चिचोंडी परिसरातील  कोल्हार -शिराळ -डमाळवाडी -गितेवाडी - डोंगरवाडी -धारवाडी व शेजारच्या गावातील शेतकर्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जय हिंदचे  शिवाजी पालवे . मेजर शिवाजी गर्जे . मदन पालवे .अॅड पोपट पालवे अॅड संदिप जावळे ,सरपंच शिवाजी पालवे ,आजिनाथ पालवे, मा सरपंच बाबाजी पालवे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या