लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ . नगर : राजकारण हे केवळ निवडणूकी पुरतेच असावे . त्यानंतर झाले गेले विसरून सर्वांनी एक दिलाने सर्व सामान्यांच्या विकासासाठी झोकून देऊन काम करावे . असे प्रतिपादन अ . नगर महापालिकेचे नगरसेवक रामदासशेठ आंधळे यांनी केले .
जोगेवाडी ( ता . पाथर्डी ) येथील नव निर्वाचित सरपंच मुक्ताबाई आंधळे . उपसरपंच राजेंद आंबिलढगे यांचेसह नूतन सदस्य बाळासाहेब आंधळे , सविता बडे व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते .
पुढे बोलताना रामदास शेठ म्हणाले की, निवडणूक ही लोकशाहीतील महत्वाचा भाग आहे . निवडणूकीत एक मेकांवर आरोप - प्रत्यारोप केले जातात . तात्वीक मतभेद निर्माण होतात ती वैचारिक बाब असून या काळात जे मतभेद व वितुष्ट येते ते तेथेच सोडले पाहिजे . म्हणजे तेवढ्यापुरते राजकारण असते ते सोडून सर्वांना विचारात घेऊन गांवाचा विकास साधून आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले .
यावेळी नूतन सरपंच श्रीमती मुकाबाई आंधळे यांनी . गांवात अनेक समस्या आहेत . विशेषतः रस्ते , वीज , पाणी . आरोग्य या मुलभूत सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील . याबरोबरच शासनाच्या विविध योजना सक्षमपणे राबवून जोगेवाडी ला आदर्श ग्राम बनवि व्यासाठी प्रयत्न करू व आपल्या नेतत्वाखाली गांवकऱ्याना विश्वासात घेऊन गांवाचा सर्वांगिण विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहिल अशी ग्वाही दिली .
.यावेळी नूतन सदस्य बाळासाहेब आंधळे यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमास दत्ताशेठ आंधळे , अमोलशेठ आंधळे , केशव होडशीळ , बयाजी आंधळे , संदीप बडे , माऊली सारुक , बाबाजी बडे , रमेश ढाकणे . आजिनाथ आंबिल ढगे . अॅड . नामदेव सारुक , राजेंद्र आंधळे . बबन बांगर , संभाजी आंधळे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 टिप्पण्या