Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक : खा.सुजय विखे यांचा आमदार रोहित पवार यांना ‘ जोर का धक्का धिरेसे’

 कर्जत मधून भारतीय जनता पक्षाचे अंबादास पिसाळ यांचा अवघ्या एक मताने विजय 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 कर्जत:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामधून भारतीय जनता पक्षाचे अंबादास पिसाळ यांनी (37 मते)  महाविकास आघाडीच्या उमेदवार मीनाक्षीताई साळुंके (36 मते) यांचा एक मताने पराभव केला. मात्र तालुक्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतांच्या फोडाफोडीचे राजकारणाची परंपरा यावेळी देखील कायम राहिली. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चुरशीची व लक्षवेधी अशी निवडणूक कर्जत मध्ये झाली.

महाविकास आघाडीचा पराभव धक्कादायक

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत तालुक्यामध्ये एकूण 74 मतदार होते यापैकी 73 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीमध्ये महा विकास आघाडीकडून विद्यमान संचालिका मीनाक्षीताई साळुंखे यांना उमेदवारी  देण्यात आली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या त्या पत्नी होत. त्यांना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार रोहित पवार यांचा पाठिंबा होता. तर दुसरीकडे अंबादास पिसाळ यांना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व माजी मंत्री राम शिंदे यांचा पाठिंबा होता.

आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी स्वतः मतदारांशी संपर्क साधून तब्बल 45 मतदार साळुंके यांच्या बाजूने उभा केले होते. 

विखे  फॅक्टर प्रभावी ठरला..

दुसरीकडे अंबादास पिसाळ यांच्यासाठी खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पटील व राम शिंदे हे मदत करत होते. मात्र या निवडणुकीत खा. सुजय विखे पाटील यांनी अंबादास पिसाळ यांना सोबत ठेवत गनिमी काव्याने निवडणूक लढवत विखे  फॅक्टर प्रभावी   करिश्व्मा दाखवत विजय खेचून आणला. 

तब्बल नऊ मते फुटली

मतदानाच्या आदल्या रात्री बारामती येथे एका हॉटेलवर साळुंके यांच्या सोबत 45 मतदार होते. मात्र प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर तब्बल 9 मते यामध्ये फुटल्याचे दिसून आले, हा आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो. तालुक्यामध्ये कोणती नऊ मते फुटली यावर आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजपच्या व अंबादास पिसाळ आणि विखे समर्थकांनी शहरामध्ये तालुक्यात फटाके फोडून व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यानंतर ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज मंदिरामध्ये विजयी सभा घेण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक अंबादास पिसाळ बोलताना म्हणाले की, सुरुवातीला ही निवडणूक माझ्यासाठी एकतर्फी होती, मात्र काही नेत्यांच्या सहभागामुळे व दबावाचे राजकारण यामुळे अडचण निर्माण झाली होती. परंतु माझा असलेला सर्वांशी संपर्क मी केलेल्या मागील पाच वर्षांची कामे तसेच सर्वसामान्य शेतकरी व जनतेला मी यावेळी जिल्हा बँकेमध्ये निवडून जावे, असा  वाटणारा विश्वास यामुळे मला विजय मिळाला.

 

य पुढील काळात देखील मी गट-तट न पाहता सर्व शेतकऱ्यांना मदत करणार आहे. या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या मीनाक्षीताई साळुंके यादेखील बँकेमध्ये माझ्या सहकारी होत्या. त्यांच्या पराभवामुळे मला देखील खूप वाईट वाटले आहे. परंतु पुढील काळामध्ये त्यांना देखील आपण सोबत घेऊन तालुक्यामध्ये सर्व सेवा सहकारी संस्था याचे सभासद यांना मदत करणार आहोत.

 

 यावेळी नामदेव राउत दादासाहेब सोनमाळी रूपचंद पोटरे सुरेश खिस्ती व श्री मांडगे यांची भाषणे झाली यावेळी मंगेश पाटील बप्पासाहेब धांडे काकासाहेब धांडे हितेंद्र तोरडमल आबासाहेब पाटील काकासाहेब ढेरे विनोद दळवी अनिल गदादे सुनील यादव  बंटी यादव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते

आमचा पराभव हा केवळ गद्दारांमुळे -बाळासाहेब साळुंखे

आमदार रोहित पवार यांना त्यांच्याच पक्षातील काहीजणांना धडा शिकवायचा होता, यासाठी त्यांनी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवली मात्र आमचा पराभव हा केवळ गद्दारांमुळे झाला आहे, यामुळे याची योग्य ती नोंद आमदार रोहित पवार घेतील. अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यानी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या