Ticker

6/Breaking/ticker-posts

गनिमी काव्यानं केलं अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचं अनावरण.. गुन्हा दाखल

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

जेजुरी : गनिमी काव्यानं जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करणं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगलं महागात पडलंय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय.


शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे. सेच पोलीस कामात अडथळा आणण्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

आज पहाटेच जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आलेलं असून, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन करवून घेतलंय. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन उद्या होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केलंय. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा काळ असल्यानं त्याचं उद्घाटन रखडलं होतं. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं.


गनिमी काव्यानं केलं  पडळकरांनी त्या अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचं अनावरण

शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या