( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जामखेड:- जामखेड नगरपरिषदेवर मुदत संपल्याने प्रशासकाची
नेमणूकिचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र
भोसले यांनी दिले आदेश. त्या आदेशानुसार कर्जत च्या प्रांत अधिकारी अर्चना नष्टे
यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
७ फेब्रुवारी रोजी जामखेड
नगरपरिषदेचा पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळाची मुदत संपत असल्याने दि . ८
फेब्रुवारी पासून जामखेड कर्जत उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांची
प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येत असून त्यांनी हा पदभार स्विकारावा असा आदेशच
जिल्हा अधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी काढला आहे . दि . ४ फेब्रुवारी २०२१
रोजी काढलेल्या आदेशत म्हटले आहे की , पदभार स्वीकारल्यानंतर कारभार सुरळीत करता यावा म्हणून
निवडणूका होईपर्यंत मुदत संपलेल्या अध्यक्ष व नगरसेवकांची एक समिती करून
त्यांच्याशी सल्लामसलत करून कारभार करण्यात यावा . तसेच आवश्यकते नुसार १५
दिवसातून एक बैठकही घेण्यात यावी. अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.
सद्यस्थितीला १५ फेब्रुवारीला प्रारूप
यादी प्रसिद्ध होणार आहे.त्याच्यावर हरकती व नंतर अंतिम यादी प्रसिद्ध होणार
आहे. त्यामुळे राजकीय नेते कार्यकर्ते कामाला लागले आहेत.या नगरपरिषद च्या
निवडणुकीत पुन्हा आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे हे पुन्हा एकदा
आमने सामने दिसणार आहेत.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत मध्ये भाजप व राष्ट्रवादी
कॉंग्रेस मध्ये चांगली रस्सीखेच आल्या आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे
अजूनही राजकीय वातावरण गरम असतानाच आता जामखेड नगरपरिषद ची निवडणूकिचे
बिगुल वाजणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
0 टिप्पण्या