Ticker

6/Breaking/ticker-posts

उसतोडणी फडात संत वामनभाऊ व भगवानबाबांची पुण्यतिथी साजरी..

 

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

सोनई:- येथील मुळा साखर कारखाना गट परीसरात सर्व उसतोडणी कामगार व मुकादमांनी एकत्र येवून संत वामनभाऊ व भगवानबाबांची पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. 

    
मुळा कारखाना गट परीसरात  भगवानगड परीसरातून आलेले सर्व तोडणी कामगार व मुकादम एकत्र झाले.सर्वांनी लोकवर्गणी जमा करत संत वामनभाऊ व भगवानबाबा पुण्यतिथी निमित्त पुजन व आरती सोहळा,मिरवणुक,किर्तन व महाप्रसाद वाटपाचा निर्णय घेतला. सर्व उसतोडणी कामगार महिलांनी मोठे परीश्रम घेत सहभाग नोंदविला. 

गट परीसरात सकाळी अकरा वाजता प्रतिमा  पुजन व आरती सोहळा झाला.दुपारी दोन वाजता दिंडी प्रदक्षिणा झाली.सायंकाळी येळी संस्थानचे प्रमुख रामगिरी महाराज यांचे किर्तन झाले. कार्यक्रमास मुळा कारखान्याचे कर्मचारी व शेतकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या