लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर - गावाच्या विकासात
ग्रामपंचायतीची मोठी भुमिका असते, त्यामुळेच शासनानेही ग्रामपंचायतीला सक्षम
करण्यासाठी अनेक अधिकार प्रदान केले आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीला थेट निधी मिळत
असल्याने गावाचा कायापालट होत आहे. नुतन ग्रामपंचायतीमध्ये युवकांचा मोठा सहभाग
असल्याने युवकांनी सहभागी राहून गावाचा विकास करावा. बंटी गुंजाळ यांनी गावातील
कार्यात सक्रिय राहुन गावासाठी नेहमीच नवीन करण्याचा प्रयत्न करत केला आहे. आता
त्यांची सरपंचपदी निवड झाल्याने पुढील काळातही ते गावाच्या विकासात मोठे योगदान
देऊन आदर्श गाव करतील, असा विश्वास हमाल पंचायतचे
जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी व्यक्त केला.
स्व.शंकरराव
घुले माथाडी कामगारांच्या सहकारी पतसंस्थेच्यावतीने दैठणे गुंजाळच्या सरपंचपदी
बंटी गुंजाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माथाडी कामगार पतसंस्थेचे चेअरमन बबन आजबे,
व्हाईस चेअरमन नारायण गिते, हमाल पंचायतचे
उपाध्यक्ष गोविंद सांगळे, पै.अनिल गुंजाळ, संजय महापुरे, सचिन ठुबे, सचिन
करपे, दिगंबर सोनवणे, बाळासाहेब म्हसे,
नवनाथ लोंढे, सतीश शेळके, भैरु कोतकर, जालिंदर नरवडे, बाळासाहेब
म्हसे, केरबा पोळ, आशाबाई रोकडे,रत्नाबाई आजबे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बंटी गुंजाळ म्हणाले, गाव पातळीवर सामाजिक काम करत असतांना गावातील विविध विकास कामांबाबत आपण पुढाकार घेतला. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण चांगले काम केले त्यामुळेच आता सरपंचपदीची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करुन आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करु. अनेक मित्र परिवाराचे आपणास सहकार्य असून त्यांच्या सदिच्छामुळे आपणास ही संधी मिळाली असल्याचे सांगितले. यावेळी चेअरमन बबन आजबे यांनीही बंटी गुंजाळ यांच्या कार्याचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या