Ticker

6/Breaking/ticker-posts

आयपीएस महेश गीते यांचा एसपी मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार


 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर  :- नगर जिल्ह्याचे सुपुत्र महेश गीते यांनी यु पी एस सी परीक्षेत संपूर्ण भारतात ३९९ वी रँ‌‌‍क मिळवून तेलंगना केडर मधून आय पी एस अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते भारतीय राज्त्यांय घटना भेट देऊन  सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्गचे उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते व पाटबंधारे खात्याचे संतोष आहेर मित्र मंडळाच्या वतीने या हृद्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.      


          पाईप लाईन रोडवरील श्रीराम चौकातील जे जे सायन्स अकॅडमीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सत्कार मंचावर नगरसेवक निखील वारे , बाळासाहेब पवार, विनीत पाउलबुद्धे , संतोष आहेर उपस्थित होते.  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी महेश गीते यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .  ते म्हणाले की , महेश गीते यांनी मिळवलेले यश हे काही साधे सुधे नाही . त्यासाठी खूप तपश्चर्या करावी लागते. अपरिमित कष्ट घ्यावे लागतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या घरापासून दूर राहून महेश गीते यांनी हे यश संपादन केले . आता त्यांनी आपल्या कारकिर्दीत  स्पर्धा परीक्षा देऊन आपले भवितव्य आजमावणाऱ्या तरुण पिढीला मार्ग दर्शन करावे . माझ्या मुलाला देखील आय ए एस होण्याची इच्छा आहे . त्याला देखील महेश यांनीच मार्गदर्शन करावे कारण आपण जरी पूर्वाश्रमीचे पेशाने शिक्षक असलो तरी आता अभ्यासक्रमात खूप किचकट बदल झाले आहेत. त्यातील खाचा खोचा महेश गीते यांना चांगल्याच माहित झाल्या असतील तेव्हा त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना करून द्यावा आणि आपल्या मार्गदर्शनाद्वारे आणखी आय ए एस, आय पी एस घडवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .   

             

           मुळच्या जामखेड तालुक्यातील खर्ड्याजवळील मोहोरी गावाचे रहिवासी असलेल्या महेश गीते यांनी शेतकरी उस तोड कामगार कुटुंबात जन्म घेतला. हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले. पुणे येथील कृषी महाविद्यालात एम एस सी अँँग्रीचे शिक्षण अर्धवट सोडण्याचे धाडस दाखवून दिल्ली येथे जाऊन त्यांनी यु पी एस सी परीक्षेचा अभ्यास केला आणि त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात हे यश संपादन केले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी महेश गीते यांनी संपादन केलेले यश हे वाखाणण्याजोगे असून गीते यांनी नुकतीच यु पी एस सी परीक्षा पुन्हा दिली आहे. आणि त्यांना आय ए एस ची सनद मिळवून कलेक्टर होण्याची इच्छा आहे तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होवो आणि आम्हाला त्यांचा आय ए एस अधिकारी म्हाणून सत्कार करण्याची संधी मिलो अशा सदिच्छा संतोष आहेर यांनी दिल्या .               

         यावेळी बोलताना नगरसेवक निखील वारे यांनी गीते परिवाराच्या धडाडीचे कौतुक केले . गीते आणि आपण एकाच गावचे असून सध्या शेतकरी कुटुंबातील तीन तीन वर्ग एक चे  अधिकारी गीते परिवाराने दिले आहेत. हे समाजासाठी खूप प्रेरणादाई आहे. माझे वडील क्लास वन अधिकारी  आणि आई मुख्याध्यापिका आहे. मी देखील या स्पर्धा परीक्षांचा मनापासून अभ्यास केला . मला देखील गीते यांच्यासारखेच आय ए एस अधिकारी  होऊन  प्रशासकीय सेवेत जायचे होते . मात्र चुकून राजकारणात आलो आणि वयाच्या २३ व्या वर्षी नगरसेवक होण्याची संधी मिळाली तरीदेखील आपण राजकारण विरहित समाजकारणात मग्न आहोत. यावेळी त्यांनी महेश गीते यांचे नगरमध्ये संगोपन करून त्यांना आय पी एस करणाऱ्या त्यांच्या काकू सौ. सुनिता दादासाहेब गीते यांच्या कार्याचे देखील कौतुक केले .  

              कार्यक्रमात इंजी आंधळे यांनी महेश गीते यांचा सत्कार केला . या नंतर सुनिता गीते यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केला. यावेळी  निखील इंडस्ट्रीजचे उद्योजक  अमोल घोलप, एच डी बी बँकेचे  व्पवस्थापक संदीप  पवार ,गणेश सुपेकर , उप प्रादेशिक परिवहन निरीक्षक  श्रीराम  पुंडेसंतोष चौरे , अतुल सदाफुले, शंतनू पांडव ,संतोष गाडे , मकरंद मिसाळ ,उदय चौधर, किरण कातोरे ,लहू नरवडे ,सुरज वाकळे, परिहार व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक , मानसोपचार तज्ञ प्रा. मधुकर काळे,प्रा. तेजस्विनी आहेर , प्रा. डॉ. योगिता चौधर,डॉ.केदार बडवे उपस्थित होते. हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे जे सायन्स अकॅडमीचे कृष्णकांत झा तसेच  प्राध्यापक  व कर्मचारी वृंदाचे सर्वतोपरी सहकार्य लाभले .  प्रास्ताविक संतोष आहेर यांनी केले तर सूत्रसंचालन मकरंद घोडके यांनी केले .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या