Ticker

6/Breaking/ticker-posts

रोहित पवारांनी देखिल ठोकल.. भर पावसात भाषण..!

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

अहमदनगर/ जामखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये भर पावसात भाषण केलं. उपस्थितांनी देखील पावसात उभं राहून हे भाषण ऐकलं. या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण काढली जातेय. आजोबांच्या पाउलावर पाउल ठेवुनच आगामी       राजकारणाची दिशा सपष्ट केली आहे.  


 

रोहित पवार यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात भर पावसात उपस्थितांना संबोधन करत त्यांच्या उपक्रमांचं कौतुकही केलं. हा शिवजयंती कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. रोहित पवार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आज (19 फेब्रुवारी) जामखेडमध्ये आले होते. त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि कार्यक्रमादरम्यान अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मात्र, अशाही स्थितीत रोहित पवार यांनी आपलं भाषण बंद न करता उपस्थितांशी संवाद सुरूच ठेवला.


 

रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले, “आज शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काही तरुणांनी मर्दाने खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. आज करण्यासारखे खूप होते. मात्र अचानक पाऊस आला. त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. 


मी आयोजकांना एवढेच सांगतो की, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न हे महत्त्वाचे होते. उद्देश महत्त्वाचा होता.अशाच प्रकारे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करत राहा, असे आवाहनही रोहित पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, पाऊस सुरू असतानाही रोहित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधल्याने अनेकांना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली,” असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या