Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक :मोह्टादेवी मंदिरात सोने पुरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश..!


 

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर : अंध श्रद्धेच्या नावाखाली मोहटा देवी मंदिरात सुमारे २ किलो सोने पुरून त्यावर मंत्रोपचारासाठी २५ लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने काल उशिरा दिले . त्यामुळे तत्कालिन ट्रस्टींमध्ये एकच खळबळ उडाली आहे .

याबाबत विश्वस्त नामदेव साहेबराव गरड यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती . त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यात लक्ष घातले होते . मंदिर निर्माण पूर्ण झाल्यानंतर हा प्रकार केला होता . विश्वस्त गरड यांनी त्यास विरोध देखिल केला होता परंतु इतरांनी त्यांना जुमानले नाही अखेर त्यांनी सरळ न्यायालयात धाव घेतली . 

मोहटा देवी हे पाथर्डी तालुक्यातील जागृत व प्रसिध देवस्थान असून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे . या प्रकरणावर लोकमत ने प्रकाशझोत टाकला होता . काल याबाबत न्यायमूर्ति  टी. व्ही. नलावडे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला . या निकालामुळे  तत्कालीन अध्यक्ष  असलेल्या न्यायाधिशांसह त्यावेळचे विश्वस्त अडचणीत आले आहेत॰

का पुरले होते सोने ?

सोन्याची यंत्रे मूर्तीखाली पुरल्यास ब्रम्हांडातील सुक्ष्म -अतिसुक्ष्म लहरी पकडून साठवता येतात असा दावा वास्तुविशारदाचा होता . त्यामुळे विश्वस्तांनी त्यास मंजुरी दिली होती . हे प्रकरण काही काळ धर्मादाय कार्यालयाकडेही चालले होते, त्यावर काही निर्णय झाला नव्हता ॰

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या