Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेनेने मार्केटयार्डचे टाळे तोडले

 

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर :-वाहतुककोंडीमुळे सुमारे तिन वर्षांपासून बंद असलेले नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  प्रवेशव्दाराचे टाळे शिवसेनेने घोषणाबाजी करत तोडले. रस्ते वाहतूक सुरक्षा समितीच्या आदेशानुसार आम्ही हे टाळे तोडल्याचा दावा शिवसेनेने केला असून बाजार समितीने मात्र गेट उघडण्याबाबत आम्हाला काहीही पत्र आले नसल्याचे सांगितले. मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावरील मार्केटायार्डचे प्रवेशव्दार उघडल्याबद्दल शेतकरी व व्यापा-यांनी मात्र समाधान व्यक्त केले.

नगर शहरातील मार्केटयार्ड चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. नगर बाह्यवळण रस्ता खराब झाल्यानंतर नगर शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. रस्ते वाहतूक सुरक्षा समितीचे तत्कालिन अध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांच्या समितीने नगर बाजार समितीच्या प्रवेशव्दाराची एक बाजू बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे नगर बाजार समितीत शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी येणा-या शेतक-यांचे व व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. नगर बाह्यवळण रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर नगर शहरातील वाहतुकीचा ताणही कमी झाला. त्यानंतर शेतकरी व व्यापा-यांनी मार्केट कमिटीचे बंद प्रवेशव्दार उघडण्याबाबत नगर बाजार समिती व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती.

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या रस्ते वाहतूक सुरक्षा समितीला शिवसेनेच्या पदाधिका-यांनी भेटून बंद प्रवेशव्दार उघडण्याबाबत साकडे घातले. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुतेप्रथम महापौर भगवान फुलसौंदरयुवासेनेचे विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटेअमोल येवलेमदन आढाव, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे विशाल वालकर यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन बंद प्रवेशव्दार उघडण्याबाबत विनंती केली होती.

शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार जिल्हाधिकारी भोसले यांनी बंद प्रवेशव्दार उघडण्याबाबत अनुकुलता दाखवली होती. परंतू बाजार समितीचे पदाधिकारी गेट उघडण्यास राजी नव्हते असे सांगितले.

 

 शिवसेना त्यांच्या पाठीशी

व्यापारी व शेतक-यांना ज्या-ज्या ठिकाणी त्रास असेल तिथ शिवसेना त्यांच्या पाठीशी राहील. नगर बाजार समितीतील सत्ताधा-यांनी बंद प्रवेशव्दाराच्या रस्त्याच्या आतील बाजुला गाळे काढून ते विक्री करण्याचा घाट घातला होता. शिवसेनेने गेट उघडून तो मोडून काढला.

दिलीप सातपुते, शिवसेना शहरप्रमुख

 

 

बाजार समिती शेतक-यांबरोबर आहे. गेट उघडण्याबाबत खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरु होता. गेट उघडण्याबाबत प्रशासनाने नगर बाजार समितीला कुठलेही पत्र दिले नाही. शिवसेनेने आंदोलन करत गेट उघडल्याबाबत जिल्हाधिका-यांना पत्र दिले आहे. असे बाजार सामीतेचे सचिव अभय भिसे यांनी संगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या