Ticker

6/Breaking/ticker-posts

‘या’ तालुक्याला मागील वर्षीचा पीक विमा मिळणार !

 


लोकनेता न्यूज

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 पारनेर :  जिल्हयातील सन २०१९ - २० चा खरीप  व रब्बी हंगाम (आंबे बहार फळबाग) मंजूर झालेला परंतु शेतकऱ्यांना न मिळालेला  पीक विमा जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. वंचित शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी किंवा पारनेर बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे. 

 चुकीचे खाते नंबर, सेतुकेंद्रातील तांत्रिक अडचणीमुळे नावात बदल तसेच  इतर तांत्रिक बाबीमुळे पिकविमा मंजूर होवुनही शेतकऱ्यांचे पैसे कंपनीकडे परत गेले आहेत. त्यामुळे शेतकरी पिकविम्यापासुन वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी संबंधीत तालुक्यातील ए.डी.सी.सी बँकेच्या टि.डी.ओ ऑफीसमध्ये (तालुका विकास अधिकारी) याद्या उपलब्ध असुन त्यामध्ये जर नाव असेल तर त्या शेतकऱ्यांनी फोटो सहीत बँक पासबुक, त्यावर संपुर्ण खाते नंबर ,आय एफ एस सी कोड,बैंच कोड सहीत पहिल्या पानाची सुस्पष्ट फोटो व्हाटसअप नंबर ८६००००५७८७ किंवा कृषि उत्पन्न बाजार समिती,पारनेर या कार्यालयात जमा करावे.

इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधीत तालुक्याच्या ए.डी.सी.सी बँकेच्या टि.डी.ओ ऑफीसमध्ये (तालुका विकास अधिकारी) जमा करावेत असे आवाहन जिल्हा बँकेचे नवनिर्वाचीत संचालक श्री.उदयदादा शेळके व पारनेर बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे नवनिर्वाचीत संचालक  गायकवाड यांनी केले आहे.  शेतकऱ्यांना जर याबाबत काही अडीअडचणी असतील तर त्यांनी संबंधीत तालुक्याच्या तालुका विकास अधिकारी (टि.डी.ओ) यांच्याशी संपर्क करावा.तसेच इतर रब्बी पिकांचे व मृगबहार (खरीप) पिकांचा विमा मिळणेकामी प्रयत्न करण्यात येणार आहेत.तरी जिल्हयातील पिकविम्यापासुन वंचित सर्व शेतकऱ्यांनी तातडीने कागदपत्रांची पुर्तता करुणपिक विम्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगर जिल्हा बँकेच्या सर्व नवनिर्वाचीत संचालक मंडळाने केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या