Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रिंटीग शिवाय कागदालाही किंमत नाही - तिवारी

 

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 अहमनगर: आज ऑनलाईनचा जमाना असला  पेपरलेस काम जरी सुरु असले तरी आज प्रिंटीग शिवाय कागदालाही किंमत नाहीअसेच म्हणावे लागेलछापाई क्षेत्रातील बदल आत्मसात करुन प्रत्येकाने आपला व्यवसाय केला पाहिजेत्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपली पाहिजेसप्तरंग प्रिंटर्सने गेल्या 22 वर्षांपासून प्रिटिंग क्षेत्रात चांगल्या सेवेने नाव कमविले आहेसामाजिकक्रीडाशैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले आहेत्यांच्या कार्याचा निमित्त गौरव करण्यात आला असल्याचे प्रतिपादन शिक्षक संघटनेचे सचिव विठ्ठलप्रसाद तिवारी यांनी केले.

 जागतिक मुद्रण दिनानिमित्ताने नगरमधील प्रसिद्ध सप्तरंग प्रिंटर्सचे संचालक नंदेश शिंदे यांचा शिक्षक संघटनेचे सचिव विठ्ठलप्रसाद तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलायाप्रसंगी दिनुभाऊ क्रिडा मंडळाचे सदस्य विष्णू देशमुख उपस्थित होतेयाप्रसंगी मुद्रण कलेचे संस्थापक जोहान्स बुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

   याप्रसंगी नंदेश शिंदे म्हणालेजोहान्स गुटेनबर्ग यांनी मुद्रण कला विकसित केली ही त्याकाळी एक क्रांतीच होतीत्यानंतर प्रिंटींग क्षेत्रात काळानुरुप बदल होत गेलेनवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास प्रिटींग क्षेत्रातीही चांगल्या संधी आहेत.  कोरोनामुळे सध्या प्रिंटींगक्षेत्र अडचणीत आला असला तरी भविष्यात ही परिस्थिती सुधरेलसत्कारामुळे काम करण्यास प्रेरणा  पाठबळ मिळणार असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या