Ticker

6/Breaking/ticker-posts

लाखों रूपयांच्या कमाईचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी पकडली

नगर सायबर पोलिसांची पुण्यात धडाकेबाज कारवाई

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 अहमदनगर - आयुर्वेदिक हर्बल ऑइलच्या माध्यमातून लाखो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी पुणे येथे अहमदनगर सायबर पोलिसांनी जेरबंद केली. Stanley Smith (मूळ रा.नायजेरियाह ), निलम गिरिषगोहेल उर्फ निशा शहा ( ह.रा.मोरयापार्क एफ401 राजयोग बिल्डींगजवळ ओमकार काॅलनी पिंपरी गुरव, पिंपरी चिंचवड, पुणे), Alex odudu उर्फ मार्क, Alen Miracle onembhadegbe (रा.पिंपरी गुरव, पिंपरी चिंचवड, पुणे) अशी पुण्यातून विविध ठिकाणांहून पकडण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की दि. 13 जुलै 2020 ते दि. 2 नोव्हेंबर 2020 या कालावधी दरम्यान आरोपींनी फेसबुकवरून मैत्री करून भारतातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आयुर्वेदिक कच्चामाल (हर्बल ऑइल) कमी किंमतीत खरेदी करून त्यातून लाखो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करण्यासाठी शासकीय कार्यालयाचे बनावट ई-मेल आयडी तयार करून त्याद्वारे खोटी कागदपत्रे पाठवली.14 लाख 17 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ओमकार मधुकर भालेकर (रा. केडगाव, अहमदनगर) यांनी अहमदनगर सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून भादवि कलम 419, 420, 468, सह आयटी अॅक्ट 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून त्या माहितीआधारे चारही आरोपींना पुण्यातून विविध ठिकाणांहून पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलीस खाक्या दाखविताच आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडे अधिक माहिती घेतली असता, विविध कंपन्यांचे डेबिट व क्रेडिट कार्ड आणि विविध बँकेचे पासबुक, लॅपटॉप, बँकेचे चेकबुक, 10 मोबाईल, 8 एटीएम कार्ड असा एकूण 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी बनावट कॉल सेंटरसाठीचे साहित्य त्याच्याकडे मिळून आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पो. नि. मधुकर साळवे, पोसई प्रतिक कोळी, पोहेकाँ योगेश गोसावी, उमेश खेडकर पोना दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, राहुल भुसाळे, पोकाॅ गणेश पाटील, राहुल गुंडू, अमोल गायकवाड, अभिजीत अरकल, अरुण सांगळे, पोहेकाँ वासुदेव शेलार, मपोना भागवत, सविता खताळ, पोकाॅ पूजा भांगरे, प्रितम गायकवाड, दिपाली घोडके, सीमा भांबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या