Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प


 

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले अर्थसंकल्पनांचे स्वागत

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

बीड.:-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी स्वागत केले आहे.आपल्या कृषीप्रदान देशाचा मजबूत पाया असलेल्या शेतकऱ्यांना केंद्रभागी ठेवून अर्थसंकल्पात अनेक हितदायक तरतुदी करण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट हमीभाव देण्याचे उद्दिष्ट तसेच शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केलेली १६.५ लाख कोटींचे तरतूद शेतकऱ्यांना सक्षम करणारी असल्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. 


केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी देशातील शेतकरी,शेतमजूर आणि सर्वसामान्यांना आत्मनिर्भर करणाऱ्या आहेत.तसेच आरोग्य,शिक्षण आणि स्वच्छतेला दिलेले प्राधान्य देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट अधोरेखित करणारे आहे.उज्वला गॅस योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी केलेल्या तरतुदीमुळे गरजू लोकांना मोठा दिलासा देखील मिळाला आहे,एकंदरीत आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे या अर्थसंकल्पातुन सिद्ध होत असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी म्हंटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या