Ticker

6/Breaking/ticker-posts

बोधेगावचे कल्पक जावई “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड”वर

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 शेवगाव :- बोधेगावचे जावई आणि पुण्यातील नामवंत ह्युमन रिसोर्स कंपनी टॅलेंट कॉर्प सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच ( टीएसपीएल ग्रुप)चे कार्यकारी संचालक मेहबुब सय्यद यांनी  जागतिक स्थरावर भारताचे नाव झळकावले आहे. सय्यद हे बोधेगाव येथील प्रसिध्द देवस्थान बन्नोमाँ ढर्ग्या चे पुजारी दिवंगत दगडू चाचा सय्यद यांचे जावई आहेत.

टीएसपीएल ग्रुप हे हुमन रिसोर्स सौरसिंग,मैनपॉवर सप्लाय, कॉरपोरेट ट्रेनिंग या क्षेत्रात सेवा देणारी कंपनी आहे. कोरोनाच्या काळात जिथे संपूर्ण जगातील उधोग  लॉकडाऊन मूळे मंदावले होते, अनेक कंपन्या बंद पडल्या होत्या, वर्क फ्रॉम होम चा अवलंब करून काही कंपन्यांनी आपले व्यवहार सुरू ठेवण्याचे प्रयत्न केले होते.एकंदरीतच सर्वत्र नैराश्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र अश्या नकारात्मक परास्तिथीत देखील खचून न जाता 

टीएसपीएल ग्रुप चे संस्थापक आणी कार्यकारी संचालक महेबूब सय्यद यांनी आपल्या कल्पक विचार आणि व्यवसाय कौशल्याच्या जोरावर असे काम केले की ज्याची दखल लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेला घ्यावी लागली.

महेबूब सय्यद यांनी लॉकडाऊन च्या काळात जगातील मानवी संसाधना संबधी पाच हजार लोकांना दोनशे वीस विषयांवर सोडचारशे तासांचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण दिले. ज्या मुळे या पाच हजार लोकांना लॉकडाऊन सारख्या नैराश्यपूर्ण परस्थितीत देखील नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी लाभली. टीएसपीएल च्या या उपक्रमाचा लाभ भारता सह अन्य अठरा देशातील पाच हजार लोकांनी घेतला. ज्या मुळे जागतिक पातळीवर या उपक्रमाची चर्चा झाली. टीएसपीएलच्या विक्रमा मूळे पुण्यातून दोन जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.

त्यामुळे भारत सरकारचा सामाजिक न्याय विभाग आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने नवी दिल्ली येथे महेबुब सय्यद यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल देवून गौरव केला. यावेळी नेपाळ सरकारचे मंत्री राम वीर मानन्धर,वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थे चे चेअरमन डॉ. दिवाकर सुकूल, याच संस्थेचे जर्मनीचे संयोजक विली जेजलर, स्विझरलंड चे चेअरपर्सन पुनम जेजलर, केंद्रीय गृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरिक्षक करुणा सागर, दुरदर्शनचे महानिदेशक मंयक आगरवाल, गुरू ग्रामच्या पोलीस महानिरिक्षक डॉ.. राजश्री सिंह इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या