Ticker

6/Breaking/ticker-posts

‘आंदोलनजीवी' जमातीपासून देशाला वाचविण्याची गरज- पंतप्रधान

 

लोकनेता न्यूज 

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली :- ' श्रमजीवी... बुद्धीजीवी... असे शब्द आपल्याला माहीत आहेत. आपण सगळेच काही शब्दांशी परिचीत आहोत, 
परंतु, गेल्या काही दिवसांपासून एका नव्या जमातीची पैदास देशात झाल्याचं मला दिसून येतंय आणि ही आहे 'आंदोलनजीवी' जमात... वकिलांचं आंदोलन सुरू आहे, तिथे ही जमात जाणार... विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथेही दिसणार... मजुरांचं आंदोलन सुरू आहे तिथेही दाखल होणार... कधी पडद्याच्या मागे तर कधी पडद्याच्या समोर... ही संपूर्ण टोळीच आंदोलनजीवी आहे. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाहीत. आपल्याला अशा लोकांना ओळखायला हवं...' अशी टोलेबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय.

    सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत  राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देतानाच शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरही भाष्य केलं. या भाषणात त्यांनी 'आंदोलनजीवी - एक नवी जमात' म्हणतानाच या जमातीपासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय.

    'आपण सगळेच काही शब्दांशी परिचीत आहोत, श्रमजीवी... बुद्धीजीवी... असे शब्द आपल्याला माहीत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून एका नव्या जमातीची पैदास देशात झाल्याचं मला दिसून येतंय आणि ही आहे 'आंदोलनजीवी' जमात... वकिलांचं आंदोलन सुरू आहे, तिथे ही जमात जाणार... विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथेही दिसणार... मजुरांचं आंदोलन सुरू आहे तिथेही दाखल होणार... कधी पडद्याच्या मागे तर कधी पडद्याच्या समोर... ही संपूर्ण टोळीच आंदोलनजीवी आहे. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाहीत. आपल्याला अशा लोकांना ओळखायला हवं...' अशी टोलेबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय.

देशाला वाचविण्याची गरज'
    हे आंदोलनजीवी लोक कधीही स्वत: आंदोलन करत नाही, परंतु, कुणाचंही आंदोलन सुरू असेल तिथे घुसतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत, जे प्रत्येक ठिकाणी भेटतील. 'विदेशी विध्वंसक विचारधारा'  या नव्या 'एफडीआय'पासून देशाला वाचविण्याची गरज आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.
खलिस्तान समर्थकांवर टीका
    आत्मनिर्भर भारत हे कोणत्याही सरकारचं नाही तर देशाचं आंदोलन आहे. काही लोक आहेत जे भारताला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशावेळी आपल्याला सतर्क राहायला हवं. पंजाबची फाळणी झाली, १९८४ च्या दंगली झाल्या आणि उत्तर पूर्णमध्येही अशा गोष्टी घडल्या. यामुळे देशाला मोठं नुकसान सहन करावं लागलं. हा देश शिखांवर गर्व करतो परंतु, काही लोक शीखांच्या डोक्यात काही चुकीच्या गोष्टी भरण्याचं काम करत आहेत, असं म्हणत पंतप्रधान 
मोदींनी 'खलिस्तान' समर्थकांवर टीका केली.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या