Ticker

6/Breaking/ticker-posts

क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी यंदाची आयपीएल मुंबईत

 


 


लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

मुंबई : आयपीएलच्या १४ व्या मोसमातील साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन यंदा मुंबई आणि मुंबईनजीकच्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात बरेच स्टेडियम असल्याने बीसीसीआयने मुंबईत साखळी सामने खेळवण्यास पसंती दिली आहे. 

मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळले जाणार आहेत अशी माहिती टीओआयने दिली आहे.

बहुप्रतिक्षित आयपीएलच्या १४ व्या हंगामाला एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते. दरम्यान यावर्षीच्या आयपीएलसाठी महाराष्ट्राच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण यावर्षी आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार असल्याचे आता समोर येत आहे. हे सामने नेमके कुठे होणार आहेत हे सुद्धा आता समोर येत आहे. कोरोनामुळे आयपीएलचे सामने एकाच राज्यात खेळवण्याचा निर्णय यावेळी बीसीसीआयने घेतल्याचे समजते आहे.

महाराष्ट्रामध्ये फार कमी अंतरामध्ये बरेच स्टेडियम्स आहेत. त्यामुळे यावेळी आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार आहेत. आयपीएल एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. तोपर्यंत चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचे सामने पाहायला मिळू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील चाहत्यांना आयपीएलचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचा आनंद यावेळी लुटता येऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या