ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे खूप बदल दिसून आले. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल, पब, रेस्टॉरंट्ससह इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी बंदी घालण्यात आली. पण आता परिस्थिती नियंत्रणात आली असता, केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनेनुसार आज शाळा, महाविद्यालये आणि सिनेमा घरे सुरु करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. आजही कोरोनाचा प्रसार होताना दिसतं आहे. परंतू परिस्थिती पूर्वीच्यापेक्षा अधिक नियंत्रणाखाली आहे. देशभरात लसीकरणाला देखील सुरूवात झाली आहे.
काही दिवसांत कोरोना लसीचा पहिला डोस लाखो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता मार्च 2020 पासून बंद असलेली शाळा आणि सिनेमा घरे सरु करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने दहावी ते बारावीची शाळा यापूर्वीच सुरु केल्या होत्या, परंतु आता काही राज्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्याची सुरुवात आजपासून होत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, पंजाबपर्यंत सर्व राज्यांच्या सरकारांच्या परवानगीने आजपासून ऑफलाइन वर्ग सुरू झाले आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाने 1 फेब्रुवारीपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमा हॉल सुरू करण्यास
कोरोना व्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार थिएटर आणि मल्टिप्लेक्समधील लोकांच्या बसण्याची क्षमता ही एसओपीचं पालन करून सध्याच्या 50 टक्क्यांवरून 100 टक्के करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मागील 10 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली झालेली आहे. मागील 10 महिन्यांपासून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं मुंबई लोकल सुरु केली होती. मात्र सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता. पण आजपासून मात्र ठराविक वेळेत सर्वसामान्यांना लोकल प्रवास पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, तर दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र वेळेचं बंधन तोडल्यास मुंबईकरांवर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे.
कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला एका राज्यातून दुसर्या राज्यात परवानगी घ्यायला लागायची. पण आतापासून याची आवश्यकता भासणार नाही. आजपासून, आपल्याला एका राज्यातून दुसर्या राज्यात जाण्यासाठी कोणत्याही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त आपल्याला कुठेही प्रवास करता येणार आहे.
0 टिप्पण्या