Ticker

6/Breaking/ticker-posts

मोठी बातमी .. अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा !


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी उडालेल्या राजकीय गदारोळामुळे शिवसेनेचे आमदार व वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपला  राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही वेळा पूर्वी सुपूर्त केला आहे .

राठोड यांच्या राजीनाम्या बाबत शिवसेना खा . संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शांत बसणार नाहीत . कोणावरही अन्याय होणार नाही असे सूचक विधान करून राठोड यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले होते . पूजा आत्महत्या प्रकरणा मुळे सरकार आणि सेनेवर प्रचंड दबाव वाढला होता . अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्यावा लागत होता . वेगवान राजकीय घडामोडी सुरु होत्या अखेर या सर्वांची परिणीती राठोड यांच्या राजीनाम्यात झाली . अधिवेशनापूर्वी एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला आहे .

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री राठोड यांच्या वरील आरोपावरून गेले १५ दिवसांपासून राजकीय क्षेत्रात मोठा गदारोळ सुरु होता. विशेषत : विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी राठोड यांच्या वरील आरोपावरून सरकारला आणि शिवसेनेला कोंडित पकडले आहे .

भाजपाने राठोड यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली असून आंदोलनांचे दररोज नव नवीन फंडे राबविण्यात येत आहेत . सेना आणि सरकारवरही आरोपांची राळ उडवून दिली आहे . त्यामुळे शिवसेना अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर दबाव वाढला होता . या दबावातूनच मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते . आज राठोड यांचा राजीनामा घेऊन विरोधकांना शांत करण्याचा निर्णय घ्यावा लागला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या