Ticker

6/Breaking/ticker-posts

या रस्त्याने जायचे नाही; कोयता, कु-हाडने मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 पांरीपूल:- वांजोळी (ता.नेवासा)येथे आपल्या  शेतात पीकास पाणी देण्यासाठी जात असताना या रस्त्याने जायचे नाही म्हणत कोयता, कु-हाड व काठीने मारहाण केल्याप्रकरणी चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  या घटनेबाबत पोलिस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की,मनिषा संजय दळवी यांनी फिर्याद दिली की,पती संजय दळवी शेतात जात असताना त्यांना या रस्त्याने जायचे नाही असा दम देवून कोयता व कु-हाडीने डोके व पायाला गंभीर जखमी केले. जीवे मारण्याच्या उद्देशाने ही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

    फिर्यादीवरुन सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२० भा.द.वि.३०७,३२४,५०४,५०६,३४ प्रमाणे  सतिष शिवाजी खंडागळे, कारभारी अंकुश खंडागळे, शिवाजी अंकुश खंडागळे व अविनाश शिवाजी खंडागळे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे करत आहेत. 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या