Ticker

6/Breaking/ticker-posts

जी एस महानगर बँकेच्या कार्यलक्षी संचालकपदी अशोक नवलेलोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 


पारनेर: -अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नवलेवाडी येथील व जी एस महानगर बँकेचे दादर शाखेचे शाखा व्यवस्थापक अशोक सुखदेव नवले या़ंची जी एस महानगर को ऑप बँकेच्या कार्यलक्षी संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

     मुंबई आणि महाराष्ट्रातील सहकारी बँक कर्मचा-यांची एकमेव व मान्यताप्राप्त संघटना को ऑप बँक एम्प्ला्ॅईज युनियन मुंबई चे अध्यक्ष,शिवसेना नेते,माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि संसदरत्न,माजी.खा.आनंदराव अडसूळ यांच्या आशीर्वादाने,युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी व सरचिटणीस नरेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शना नुसार झालेल्या बैठकीमध्ये श्री.नवले यांची निवड करण्यात आली आहे.

 अशोक सुखदेव नवले हे शालेय जीवनापासून शिवसैनिक म्हणुन कार्यरत आहेत,मुंबई चे पहिले महापौर स्वर्गीय प्रिंसिपल वामनराव महाडिक यांच्या निवडणूक प्रचारासाठी बालपणी शिवसेनेचा खांद्यावर घेतलेला भगवा झेंडा आजही कायम आहे माझगाव - घोडपदेव - फेरबंदर मधील स्थानिक राजकारणात  तत्कालीन शिवसेना नेते नामदार छगनराव भुजबळ यां च्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीपासुन शिवसेनेत सक्रिय सहभाग घेतला आहे,जायंट किलर बाळा नांदगावकर यांचें ते अगदी जवळचे सहकारी होते, त्यांच्या सोबत त्यांनी पारनेर तालुका संपर्क प्रमुख म्हणुनही काम केले आहे,पारनेर तालुक्यातील तत्कालीन शिवसेना नेते सबाजीराव गायकवाड यांच्या सोबतीने त्यांनी संपूर्ण तालुक्यात शिवसेना शाखा वाढीसाठी भरीव योगदान दिले आहे,त्यांनीं शिवसेनेत अनेक छोटी मोठी पदे उपभोगली,त्यानंतर ते ऐरोली नवी मुंबई येथेही मा.विजय चौगुले बरोबर शिवसेनेचे संघटनात्मक कामकाजात सहभागी झाले होते.

 महानगर बँकेच्या संस्थापक संचालक असलेले त्यांचे वडिल स्वर्गीय सुखदेव नवले यांच्याकडुन मिळालेल्या सहकाराच्या बाळकडु मुळे ते महानगर बँकेच्या युनियनचे सक्रिय सभासद झाले आणि अल्पावधीतच ते कमिटी सदस्य,सह संघटक सचिव आणि मागील तीन वर्षांपासून संघटक सचिव म्हणून महानगर बँकेच्या युनियन मध्ये काम करत आहेत.

 युनियनचे अध्यक्ष शिवसेना नेते माननीय आनंदराव अडसूळ यांच्या मागील तीन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते अमरावती मतदार संघात सक्रिय सहभागी आहेत .त्यांच्या या प्रामाणिकपणा आणि अभ्यासु वृत्तीमुळेच त्यांची मा.खा.आनंदराव अडसूळ यांनी जी एस महानगर बँकेचे कार्यलक्षी संचालक पदावर नियुक्ती केली आहे. त्यांचे सर्व स्थरातुन हार्दिक अभिनंदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या