Ticker

6/Breaking/ticker-posts

चिंताजनक : अमिताभ बच्चन यांची प्रकृती ढासळली !

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई :"मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही”, असा अमिताभ बच्चन यांनी लिहिलेला ब्लॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अमिताभ हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत त्यांचे विचार व्यक्त करत असतात. नुकताच त्यांनी एक ब्लॉग लिहिलेला असून, तो चर्चेत आहे. या ब्लॉगमुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.


अमिताभ यांनी हा ब्लॉग शनिवारी रात्री लिहिला होता. ‘मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही, असे अमिताभ यांनी त्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्यांच्या हा ब्लॉग पाहिल्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. नक्की शस्त्रक्रिया कसली आहे? कुठे आणि कधी ही शस्त्रक्रिया होणार? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.


अमिताभ अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात लवकरच दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ यांच्या सोबत अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार आहेत. सोबतच अभिनेता इम्रान हाश्मी सोबत ते ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहेत. तर ‘सैराट’ दिग्दर्शक नागारज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत अमिताभ दिसणार आहेत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या