Ticker

6/Breaking/ticker-posts

त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे

 

    लोकनेता न्यूज

    ऑनलाईन न्यूज नेटवर्क

बारामती : अमित शहा  यांच्या पायगुणामुळं राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्गात येत आहेत. त्यातदरम्यान, भाजपच्या नेत्यांनी ऑपरेशन लोटसचे संकेत दिले आहेत. तर, नारायण राणे यांनी अमित शहा महाराष्ट्रात, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार महाराष्ट्रात यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. नारायण राणेंच्या या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी सरकारची बाजू सावरली आहे. ते बारामती येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.

नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. नारायण राणेंच्या वक्तव्याकडे त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असा मिश्लिक टोला पवारांनी लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या