Ticker

6/Breaking/ticker-posts

राष्ट्रवादीच्या " या" आमदार लग्नाच्या बेडीत !

 नाशिक येथे लग्नाला खा . पवार यांचेसह दिग्गजांची उपस्थिती

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नाशिक : जिल्हयातील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांचा विवाह सोहळा नाशिक तालुक्यातील अलास्का बँक्वेट हॉलमध्ये आज पार पडला.डॉ. प्रविण वाघ यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या. 

या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, विधानसभाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर यांनी उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिले.

विवाह सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे ,सर्वोसर्वा खा.शरद पवार, ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुण्याची बैठक आटपून विवाहाला उपस्थित राहिले आहेत.

अतिशय मोजक्या मंडळींच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त मंडळींना आमंत्रण न देता आप्तेष्ट, घरातील मंडळी, मोजके नातेवाईक आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

सरोज अहिरे विद्यमान आमदार

सरोज अहिरे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. मतदारसंघात जनतेशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या सुपरिचित आहेत.

कोण आहे नवरा मुलगा?

चोरडिया -चोपडा नगर येथे असलेल्या कल्पना आणि रामदास वाघ यांचे चिरंजीव डॉ. प्रवीण वाघ यांच्याशी सरोज अहिरे यांनी सप्तपदी घेतली. प्रवीण वाघ हे दाताचे डॉक्टर आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या